coronavirus : आम्हाला पण सुविधा द्या; बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 04:00 PM2020-05-19T16:00:17+5:302020-05-19T16:01:17+5:30

आम्हाला हॉस्टेलमध्ये न ठेवता एखाद्या हॉटेलमध्ये ठेवावे किंवा जेथे सुरक्षित व स्वच्छ जागा आहे, अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे.

coronavirus: give facility to us; Beed District Hospital doctor aggressive for demands | coronavirus : आम्हाला पण सुविधा द्या; बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आक्रमक

coronavirus : आम्हाला पण सुविधा द्या; बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आक्रमक

Next
ठळक मुद्दे ज्या डॉक्टरांनी आंदोलन केले, अशा सर्वांनाच नोटीस बजावणार

बीड : कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना राहण्याची चांगली व्यवस्था नाही. तसेच इतरही सुविधा नसल्याचे सांगत जिल्हा रुग्णालतील डॉक्टर आक्रमक झाले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मागणी पूर्ण होत नसल्याने आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बीडच्या जिल्हा रूग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी २५० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय तयार केले आहे. सध्या येथे चार कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रोटेशन नुसार डॉक्टरांच्या ड्यूटी लावल्या जात आहेत. येथे कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांना घरी न जात रुग्णालयाच्या परिसरातच राहण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु ही जागा व्यवस्थित नाही. तेथे शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था नाही. आयसोलेशन वॉर्डमध्ये डॉक्टरांना बसण्यासाठी स्वतंत्र खोली नाही. इतरही सुविधा मिळत नाहीत, असे सांगत डॉक्टरांनी मंगळवारी सकाळी एकत्र येत संताप व्यक्त केला.

आम्हाला हॉस्टेलमध्ये न ठेवता एखाद्या हॉटेलमध्ये ठेवावे किंवा जेथे सुरक्षित व स्वच्छ जागा आहे, अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे. याबाबत आपण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याकडे मागणीही केली होती, परंतू त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून हे सर्व प्रश्न मांडणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, ज्या डॉक्टरांनी आंदोलन केले, अशा सर्वांनाच नोटीस बजावणार असल्याचे डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.

Web Title: coronavirus: give facility to us; Beed District Hospital doctor aggressive for demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.