शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : लग्नासाठी नातेवाईक जमवले; वधू-वराचे आईवडील, भटजी आणि फोटोग्राफर पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 19:05 IST

जिल्हाधिकारी यांचा आदेश डावलला

ठळक मुद्देनातेवाईक जमवून लग्न लावणा-या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

माजलगाव  : कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश डावलत नातेवाईकांना जमवून लग्न लावणाऱ्या भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना गुरुवारी पोलीस कोठडींची हवा खावी लागली. ही घटना तालुक्यातील ब्रम्हगाव येथे घडली. 

माजलगाव शहरापासून 1 किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास लग्नासाठी जमाव जमला असल्याची माहिती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली. यावरून त्यांनी शहर पोलीसांना लग्नस्थळी जाण्यास सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस ताफा घेवून लग्नस्थळी गेले असता. यावेळी पोलिसांना लग्नस्थळी 100-125 लोक जमल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याची उदघोषणा करुन जमलेल्यांना परत जाण्यास सांगितले. यास नकार देत लग्न लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे पोलीसांनी लग्न लावण्यास आलेले भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केले. यानंतर 5-6 नातेवाईकांनी सदरचे लग्न उरकुन घेतल्याची माहिती आहे. ही कारवाई पो.हे.शरद पवार, पो.ना.किशोर राऊत, पो.ना.अजय सानप, पोहेका ज्योती कापले, चालक विनायक अंकुशे आदींनी केली. या घटनेने येत्या काही दिवसात लग्न असणाऱ्या नातेवाईकांमध्ये  खळबळ माजली आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल : विठ्ठल पांडुरंग कांबळे रा.ब्रम्हगाव ता.माजलगाव  (नवरीचे वडील),मनकर्णा सुभाष पाटोळे रा लवुळ ता.माजलगाव (नवरदेवाची आई),ज्ञानेश्वर उद्धव पाटोळे रा.लवुळ( नवरदेवाचे चुलते),चंदू महादेव आटवे रा.लवुळ(नवरदेवाचे मामा),कैलास सुदाम कसाब रा.गोळेगाव ता.परतुर(नवरीचा मामा),सुनील सुदाम वैराळ रा.सांवगी ता.परतुर(सोकान्या),स्वप्निल अनिल कुलकर्णी रा.डेपेगाव ता.माजलगाव (भटजी),गणेश अनंत मारगुडे रा.खानापुर(फोटोग्राफर) यांचा समावेश होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडmarriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस