शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

coronavirus : पाडवा आला तरी सालगडी ठरेनात; कोरोनाच्या भीतीने बाहेर जिल्ह्यातील मजुरांना पाठवले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 17:10 IST

गावागावात अनेक बाहेर जिल्ह्यातील लोक सालगडी म्हणून राहण्यासाठी आले होते

- पुरूषोत्तम करवामाजलगाव : गुढीपाडवा येण्याच्या एक दिन महिन्या अगोदर शेतकरी आपल्याला कोणता सालगडी ठेवायचा याची चाचपणी करत असतो परंतु यावर्षी कोरोना च्या भीतीने शेतकऱ्यांनी अध्याप सालगडी ठरवले नसून परजिल्ह्यातून कामासाठी आलेल्या लोकांना शेतकऱ्यांनी परत पाठवून एक महिन्याने येण्याचा सल्ला देखील दिला आहे.

गुढीपाडव्याला शेतकरी सर्व नवे-जुने व्यवहार करत असतो. यात प्रामुख्याने आपल्याला किती गडी लागतात हे पाहुन व 2-3 महिण्यांपासुन दुसऱ्याचा चांगला गडी आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. एक दुसऱ्याचा गडी लावण्यात अनेक वेळा गावात भांडणे देखील होतात.या वर्षी बुधवारी गुडी पाडवा असतांना 75 टक्के शेतकऱ्यांचे अद्याप सालगडी देखील ठरलेले नाहीत. मागील 10-12 दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने अनेक शेतकरी आपल्या गावाकडे फिरकलेच नाही तर गावातच राहणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या भीतीने घराबाहेर निघणे बंद केले व अनेकांनी भेटीगाठी देखील टाळल्याने यावर्षी सालगडी ठरविण्यात उशीर झाला आहे.   

माजलगाव तालुक्यात परभणी , सेलू , मानवत , जालना , आष्टी  ,परतूर , मंठा आदि या भागातील अनेक लोक आपल्याला मोलमजुरी मिळावी म्हणून आपल्यामुळे मुलाबाळांसह याठिकाणी येतात. परंतु कोरोनाच्या भीतीपोटी अनेक जण इकडे फिरकलेच नाहीत तर अनेक जण आले असतानादेखील शेतकऱ्यांनी त्यांना  कोरोना संपल्‍यानंतर आपण यावे असा सल्ला देऊन त्यांना परत पाठवले.

शेतीच्या मशागतीला पाडव्याचे मुहूर्त टळणार ?अनेक बाहेरगावी राहणारे व आपल्याकडे शेतात काम करण्यासाठी बारदाना नसलेले अनेक शेतकरी पाडव्याच्या दरम्यान आपली शेती ठोक्याने किंवा बटईने देत असतात.परंतु कोरोनाच्या भितीने अनेक शेतकऱ्यांची बटाईदाराशी किंवा ठोक्याने जमीन घेणारांची गाठभेटच होऊ शकली नाही. पाडव्याच्या मुहूर्तावर ठोक्याने किंवा बटईने घेणारे लोक शेतीच्या मशागतीला सुरुवात करतात. परंतु यावर्षी सालगडी  व जमीन ठोक्याने किंवा बटईने देण्यास उशीर झाल्याने शेतीच्या मशागतीला पाडव्याचे मुहूर्त टळणार आहे .

गावागावात अनेक बाहेर जिल्ह्यातील लोक सालगडी म्हणून राहण्यासाठी आले होते परंतु कोणाच्या भीतीमुळे बाहेर जिल्ह्यातील लोकांना सालगडी म्हणून अद्याप कोणीच ठरवलेले नसल्याने व बटाईने जमीन दयायला उशीर झाल्याने यावर्षी शेत कामाला उशिरच होण्याची शक्यता आहे.--- राजेंद्र भंडारी , शेतकरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडFarmerशेतकरी