शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

CoronaVirus : 'बाबांनो, वेळेवर जेवण-पाणी घ्या'; बीडच्या डीएचओंची सहकारी, कर्मचाऱ्यांना भावनिक साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 12:49 PM

डोक्यावर सुती कापडा अन् सोबत पाण्याची बाटली ठेवून काम करा

- सोमनाथ खताळबीड : कोरोनाविरूद्ध लढा देण्यात आतापर्यंत आपण यशस्वी झालो आहोत. परंतू ही लढाई इथेच संपली नाही. आणखी लांबचा पल्ला गाठायचा आहे. हे करताना स्वता:ची काळजी घ्या. वेळेवर जेवण करा, उनातून बचावासाठी डोक्यावर सुती कापडा आणि सोबत पाण्याची बाटली ठेवा. असा भावनिक संदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य विभागातील शिपाई ते अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाºयांपर्यंतच्या अधिकारी, कर्मचाºयांना दिला आहे. 

बीड जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. गावपातळीवर केली जात असलेली जनजागृती, बाहेरून आलेल्या लोकांची नोंदणी, चौकशी यासारखे नियोजन केले जात आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, परिचारीका, आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी, सीएचओ, तालुका आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी हे सर्वच लोक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. जीव धोक्यात घालून दिवसरात्र कोरोनाशी लढा देत आहेत. आतापर्यंत या लढ्याला यशही आले आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर, परभणी, लातूर, हिंगाली, जालना, जामखेड या बाजूच्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. परंतु या कोरोनाला सिमेवरच रोखण्यात बीड प्रशासनाला यश आलेले आहे. पोलीस, आरोग्य, कृषी, महसूल, शिक्षण असे सर्वच विभाग जीव ओतून काम करीत आहेत. 

दरम्यान, मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या या लढ्यात आरोग्य कर्मचाºयांचे काम कौतुकास्पद आहे. आणखी आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे खचून जावू नका. स्वता:ची काळजी घ्या, सोशल डिस्टन्सींग ठेवून कर्तव्य बजवा, तोंडाला मास्क लावा, हात स्वच्छ धुवा, जास्त संपर्कात येऊ नका, गर्दीत जावू नका, उन खुप असल्यामुळे डोक्यावर सुती कापडा घ्या. संतूलीत आहार आणि कर्तव्यावर जाताना सोबत पाण्याची बाटलीही असूद्या. अवश्यकता भासल्यास ओआरएस सोबत राहूद्या, असा संदेश सर्वांना देत डॉ.पवार यांनी आपल्या सहकाºयांसह कर्मचाºयांना प्रोत्साहन दिले आहे. या भावनिक संदेशामुळे अधिकारी, कर्मचारी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

मी तर काम करतोच. परंतु ग्राऊंड लेव्हलवर काम करणारा शेवटचा कर्मचारीही तितकाच महत्वाचा आहे. शिपाई ते अधिकारी हे सर्वच कोरोना लढ्यात जीव ओतून काम करीत आहेत. हा स्टाफच माझी ताकद आहे. त्यांना अडचणीत सहकार्य करणे आणि प्रोत्साहन देणे हे माझे कर्तव्य समजतो.- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड