कोरोनाचे तीन बळी; १९ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:31 IST2021-02-12T04:31:23+5:302021-02-12T04:31:23+5:30
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे मृत्यूसत्र थांबले होते; मात्र गुरुवारी पुन्हा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद जिल्हा आरोग्य विभागाच्या पोर्टलवर ...

कोरोनाचे तीन बळी; १९ नवे रुग्ण
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे मृत्यूसत्र थांबले होते; मात्र गुरुवारी पुन्हा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद जिल्हा आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली आहे. यामध्ये लव्हुरी (ता.केज) येथील ६५ वर्षीय महिला, अंबाजोगाई शहरातील ५० वर्षीय पुरुष व बीड शहरातील नगर रोडवरील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे, तसेच गुरुवारी जिल्ह्यात ४८२ संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ४६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १९ नवे रुग्ण निष्पन्न झाले. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यात ५, बीड ७, गेवराई, परळी व शिरुर तालुक्यातील प्रत्येकी २ तसेच केज तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजार १०५ इतकी झाली आहे. पैकी १७ हजार ३४२ जण कोरोनामुक्त झाले असून, ५६२ जणांचा मृत्यू झाला आहे.