कोरोनाची वाटचाल अर्धशतकाकडे; रायमोह पट्यात अधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:31 IST2021-04-12T04:31:25+5:302021-04-12T04:31:25+5:30

तालुक्यात रविवारी प्राप्त अहवालानुसार ‘कोरोना’बाधित रुग्ण संख्येची वाटचाल अर्धशतकाकडे असून ४५ रुग्ण बाधित निघाले. आजही प्राप्त अहवालानुसार रायमोह पट्यातच ...

Corona's move to the half-century; More patients in Raymoh Patta | कोरोनाची वाटचाल अर्धशतकाकडे; रायमोह पट्यात अधिक रुग्ण

कोरोनाची वाटचाल अर्धशतकाकडे; रायमोह पट्यात अधिक रुग्ण

तालुक्यात रविवारी प्राप्त अहवालानुसार ‘कोरोना’बाधित रुग्ण संख्येची वाटचाल अर्धशतकाकडे असून ४५ रुग्ण बाधित निघाले. आजही प्राप्त अहवालानुसार रायमोह पट्यातच अधिक रुग्ण निघाले आहेत.

आजपर्यंत तालुक्यात फारसे रुग्ण निघत नव्हते. मात्र नव्हतेच असेही म्हणता येत नव्हते. गत आठवड्यात ३१ हा आकडा सर्वाधिक होता. मात्र, नंतर तो अवघ्या सहावर आला असल्याने आलबेल मानले जात असतानाच रुग्ण संख्येत वाढ सुरू झाली आणि आता ती अर्धशतकाच्या उंबरठ्यावर ४५ इतकी झाली असल्याने कोरोना संख्येत भर पडू लागली आहे.

आता तरी लोकांनी नियमात राहणे गरजेचे आहे. अनावश्यक बाहेर पडू नये. मास्क वापराच, प्रसंग कठीणच असल्याने आपण सुरक्षित राहून कुटुंब सुरक्षित ठेवा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने तहसीलदार श्रीराम बेंडे, पोलीस उपनिरीक्षक डॉ. रामचंद्र पवार, मुख्याधिकारी किशोर सानप तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.

Web Title: Corona's move to the half-century; More patients in Raymoh Patta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.