कोरोनाचा फटका, तणाव अन् चिडचिडेपणा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:40+5:302021-02-05T08:26:40+5:30
बीड : जिल्ह्यातील मनोरुग्णांना कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. ते यातून सुधारण्याऐवजी त्यांचे मानसिक स्वास्थ्य आणखीनच बिघडल्याचे समोर आले ...

कोरोनाचा फटका, तणाव अन् चिडचिडेपणा वाढला
बीड : जिल्ह्यातील मनोरुग्णांना कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. ते यातून सुधारण्याऐवजी त्यांचे मानसिक स्वास्थ्य आणखीनच बिघडल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन काळात कामधंदा नसल्याने अनेकांमध्ये ताणतणाव वाढला होता, तसेच साहित्य, घरगुती भांडणे, यामुळे चिडचिडेपणा वाढला होता. अशा सर्व रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार विभागाकडून उपचार करण्यात आले आहेत.
राज्यात सर्वत्र कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. अगोदरच जिल्ह्यात मनोरुग्णांची संख्या अधिक आहे. त्यात लॉकडाऊन लागल्याने त्यात आणखीनच वाढ झाली. लॉकडाऊनमुळे आयपीडीचे रुग्ण कमी झाले असले, तरी ओपीडीची संख्या झपाट्याने वाढली होती. सोशल डिस्टन्सिंगच्या कारणाने आरोग्य विभागाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून तणावग्रस्त रुग्णांवर उपचार केले, तसेच त्यांचे समुपदेशनही केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, लॉकडाऊनमधील एप्रिल महिन्यात दारूचे व्यसन असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती. अचानक लॉकडाऊन लागले आणि या लोकांना दारू भेटली नाही. त्यामुळे या रुग्णांची संख्या वाढली होती. तणावग्रस्त रुग्णांना प्रकल्प प्रेरणांतर्गत मार्गदर्शन व समुपदेशनही करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचार तज्ज्ञ डॉ.माेहमंद मुजाहेद, विजया शेळके, डाॅ.अशोक मते, अंबादास जाधव, प्रियंका भोंडवे-कैतके, मनोहर तांदळे आदी टीम आलेल्या रुग्णांचे समुपदेशन करते.
झोप येईना, मन बैचेन होतेय
आपल्याला कोरोना होईल का, याचीच अनेकांना भीती होती. थोडेही कोणी खोकले किंवा ताप आलेली समजले, तरी अशा रुग्णांना तणाव येत होता. त्यांना रात्र रात्र झोप लागत नसे. मन चलबिचल होऊन बेचैनपणा येत होता. मलाच कोरोना झाला असेल, याचा संशय कायम त्यांच्या मनात येत होता, तसेच ताणतणाव, घबराहट, छाती धडधड होणे, झोपे न येणे, मनात वेगळवेगळे विचार येणे या लक्षणांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती.
कोट
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे आयपीडी कमी झाली, परंतु ओपीडी वाढली होती. कामधंदा नसल्याने, घरातील भांडणे, व्यसनाधिन लोकांची अपेक्षा पूर्ण होत नसल्याने रुग्णसंख्या वाढली होती. त्यांच्यात चिडचिडेपणा, तणाव, झोप न येणे, भीती वाटणे, बैचेन होणे असे विविध लक्षणे आढळत होते. या सर्वांवर उपचार करण्यात आले. यातील अनेकांची सुधारणा झाली असून, काही अद्यापही उपचाराखाली आहेत. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन समुपदेशन व सल्ला देऊन उपचार करण्यात आले होते
डॉ.मोहमंद मुजाहेद, मानसोपचार तज्ज्ञ जिल्हा रुग्णालय बीड
अशी आहे आकडेवारी
जानेवारी ते डिसेंबर, २०२० - आयपीडी ८५, ओपीडी २८७९
जानेवारी, २०२१ - आयपीडी १२, ओपीडी २८०