corona virus : कोरोनामुळे आष्टीतील रविवारचा आठवडी बाजार रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 16:17 IST2020-03-14T16:16:53+5:302020-03-14T16:17:52+5:30
आष्टी, मिरजगाव, जामखेड आणि कर्जत येथील व्यापाऱ्यांची वर्दळ बाजारात असते

corona virus : कोरोनामुळे आष्टीतील रविवारचा आठवडी बाजार रद्द
आष्टी : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आष्टी शहराचा रविवारी होणारा आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे. यामुळे आठवडी बाजारासाठी येणारी गर्दी टळणार आहे.
आष्टी शहराचा आठवडी बाजार हा दर रविवारी शहराच्या शिवाजी चौक, महात्मा फुले चौक, बाजार तळ या मध्यवर्ती भागात भरत असतो. या बाजारात आष्टी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव आणि जामखेड,कर्जत तालुक्यातील व्यापारी मोठ्या संख्येने येत असतात. तसेच हा बाजार तालुक्याच्या ठिकाणी असल्याने येथे भाजीपाल्याची खरेदी- विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकरी व व्यापारी वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या आठवडी बाजारातील होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हा आठवडी बाजार रद्द करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. यांची माहिती आष्टी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा संगीता विटकर,उपाध्यक्षा पंखाबाई रेडेकर यांनी दिली आहे.