corona virus : वैद्यनाथ मंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:33 IST2020-03-05T19:31:43+5:302020-03-05T19:33:39+5:30

गाभाऱ्यात आणि मंदिर परिसरात स्वच्छतेची विशेष काळजी

corona virus: Special precaution against corona virus in Vaidyanath temple | corona virus : वैद्यनाथ मंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी

corona virus : वैद्यनाथ मंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी

परळी : देशातिल बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील श्री प्रभू वैद्यनाथाच्या  दर्शनासाठी राज्य व परराज्यातून भाविक येत असतात. यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने विशेष खबरदारी घेतली जात आहे. 

आज स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांनी  सूचना दिल्या आहेत .दर दोन तासाला मंदिराच्या गाभाऱ्यात स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच क्लीनिंग मशीन ने स्वच्छता करून  मंदिर परिसर  स्वच्छ ठेवले जात आहे  , राज्य व पर राज्यातील भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने  प्रत्येक भक्ताने तोंडाला मास्क किंवा स्कार्प लावावा असे आवाहनही श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय एक पत्र पाठवून आरोग्य यंत्रणा वैद्यनाथ मंदिरात सतर्क करण्याच्यादृष्टीने कळविण्यात येणार असल्याचेही मंडळाचे सचिव राजेश देशमुख यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: corona virus: Special precaution against corona virus in Vaidyanath temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.