जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST2021-06-20T04:23:26+5:302021-06-20T04:23:26+5:30

बीड : जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या विविध विभाग व कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रॅपिड अँटिजन चाचणी करणे बंधनकारक केले आहे. ...

Corona test mandatory for Zilla Parishad officials and employees | जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक

जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक

बीड : जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या विविध विभाग व कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रॅपिड अँटिजन चाचणी करणे बंधनकारक केले आहे. गर्दी होऊ नये, यासाठी जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यात केंद्र सज्ज केले असून त्यांना वेगवेगळी तारीख निश्चित करून देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी याबाबत शनिवारी आदेश काढले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. रुग्णसंख्या घटल्याने थोडे निर्बंध घालून सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांतही नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका आहे. हाच धागा पकडून जिल्हा परिषदेंतर्गत असणारे सर्व विभाग आणि कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची रॅपिड ॲंटिजन चाचणी करणे बंधनकारक केले आहे. जिल्हा रुग्णालयासह सर्व कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात चाचणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २२ ते २४ जून दरम्यान सर्वांनी चाचणी करणे बंधनकारक आहे. तसेच मागील सात दिवसांत ज्यांनी चाचणी केली आहे, त्यांनी पुन्हा चाचणी करणे आवश्यक नसल्याचेही कुंभार यांनी आदेशात म्हटले आहे.

--

२२ ते २४ जून दरम्यान सर्व विभाग व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची अँटिजन चाचणी करण्याचे नियोजन झाले आहे. जिल्हा व तालुका स्तरावर नियोजन करून तारीख निश्चित करून दिली आहे. येथे आरोग्य कर्मचारी दिले आहेत.

-डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.

Web Title: Corona test mandatory for Zilla Parishad officials and employees