कोरोना टेस्टला फाटा, ८ दुकानांना सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST2021-03-05T04:33:36+5:302021-03-05T04:33:36+5:30
गेवराई : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व याला आळा बसावा म्हणून तहसीलदारांनी शहरातील व तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांची ...

कोरोना टेस्टला फाटा, ८ दुकानांना सील
गेवराई : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व याला आळा बसावा म्हणून तहसीलदारांनी शहरातील व तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले होते. याच अनुषंगाने बुधवारी कोरोना चाचणी न करणाऱ्या ८ व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्यात आली, तर दुचाकीवरून विनामास्क फिरणाऱ्या ४४ नागरिकांवर कारवाई करत ८ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
तालुक्यातील व शहरातील व्यापारी बांधवांना दररोज शेकडो लोकांशी संपर्क येत असल्याने या सर्व व्यापारी वर्गाची कोरोना चाचणी करण्यासाठी येथील तहसीलदार सचिन खाडे यांनी आदेश दिले होते. मात्र, या कोरोना चाचणीकडे शहरातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरविली होती. त्याच अनुषंगाने बुधवारी रात्री ८ वाजता तहसीलदार सचिन खाडे, न.प.चे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, पोलीस प्रधान, जावळे, तलाठ्यासह अनेकांनी येथील कोरोना चाचणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शहरातील विविध ८ दुकानांवर कारवाई केली. विनामास्क फिरणाऱ्या ४४ जणांना प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे ८ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात आला. त्यामुळे व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत. शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपापली कोरोना चाचणी करून घ्यावी, नसता योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार सचिन खाडे व मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी सांगितले.
===Photopath===
040321\sakharam shinde_img-20210304-wa0007_14.jpg