लोखंडी सावरगावात १०३ संशयितांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST2021-06-21T04:22:34+5:302021-06-21T04:22:34+5:30
लोखंडी सावरगाव : अंबेजोगाई तालुक्यातील आपेगाव आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या लोखंडी सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्रात १०३ संशयितांची कोरोना चाचणी ...

लोखंडी सावरगावात १०३ संशयितांची कोरोना चाचणी
लोखंडी सावरगाव : अंबेजोगाई तालुक्यातील आपेगाव आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या लोखंडी सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्रात १०३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब लोमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गायत्री धमाले, डॉ.भारत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मधुरा उन्हाळे, डॉ.अजय ठोंबरे, आरोग्य सहायक अशोक राऊत, बालाजी वाघमारे आरोग्यसेविका एस.एन. कोलपुसे, एस.व्ही. मुंडे यांनी या मोहिमेसाठी परिश्रम घेतले. एकूण १०३ पैकी ७६ जणांची अँटिजन तर २७ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.बी. शिंदे, माजी सरपंच गंगाधर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानोबा माचवे, विकास जगताप, धनंजय देशमुख, भास्कर माचवे, रश्मी सय्यद, संजय देशमुख, दत्ता कोकाटेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
===Photopath===
200621\20210619_100452_14.jpg