कोरोना पार्श्वभूमिवर प्रशासनाने सज्ज रहावे-रविंद्र जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:42 IST2021-02-25T04:42:05+5:302021-02-25T04:42:05+5:30

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही साथ आटोक्यात येण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावे यासाठी मास्क ...

Corona should be prepared by the administration in the background - Ravindra Jagtap | कोरोना पार्श्वभूमिवर प्रशासनाने सज्ज रहावे-रविंद्र जगताप

कोरोना पार्श्वभूमिवर प्रशासनाने सज्ज रहावे-रविंद्र जगताप

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही साथ आटोक्यात येण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावे यासाठी मास्क वापरत नसणारे नागरिक, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या व नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करावी. कोरोना रुग्णांवर उपचार व तपासण्यांसाठी टेस्टिंग सेंटर्स, कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर सज्ज करावी तसेच प्रशासनाने या पार्श्वभूमिवर सज्ज रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कोरोना उपाययोजनांबाबत बैठक बुधवारी संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीस औरंगाबाद विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त (विकास आस्थापना) सुरेश बेदमुथा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार , निवासी उपजिल्हाधिकारी संताष राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार , स्वारातीमग्रा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, डब्ल्यू.एच.ओ. समन्वयक डॉ.अमोल गायकवाड तसेच जिल्ह्यातील तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. कोरोना बाबत जिल्ह्यातील नागरिकात सतर्कता वाढणे साठी प्रशासनाने आखलेल्या उपायोजना तात्काळ राबविण्यात याव्यात. मंगल कार्यालये, सभागृहे, क्लासेस, गर्दी होणारी बस, वाहने आदी ठिकाणी नियम भंग होत असेल तर कारवाई केली जावी असे जिल्हाधिकारी जगताप म्हणाले.

उपायुक्त बेदमुथा यांनी सांगितले, कोरोना साथ वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. यादृष्टीने लसीकरण प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन ती यशस्वी केली जावी. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये असणारी बेड्सची संख्या तसेच वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपलब्धता ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा सज्ज ठेवून येणाऱ्या प्रसंगासाठी तयारी पूर्ण केली जावी. असे उपायुक्त म्हणाले. तर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार यांनी सांगितले की कोरोनाच्या साथीशी लढताना मागच्यावेळी जिल्ह्यात यशस्वी कार्यवाही झाली होती पुन्हा एकदा सुपर सप्रेडर्सच्या अँन्टीजन तपासण्या केल्या जाव्यात. तसेच तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व गाव स्तरांवरील यंत्रणा यांनी मागील वेळचा अनुभव ध्यानात घेता त्या आदेशांप्रमाणे तात्काळ कार्यवाही सुरुवात करावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार म्हणाले. यावेळी विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. नागरिकांनी देखील नियमांचे पालन करून कोरोना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जास्त संपर्क असणाऱ्यांच्या होणार तपासण्या

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांशी रोजचा संपर्क असलेल्या दुकानदार, व्यावसायिक, असलेले सुपर स्प्रेडर यांना कोरोना तपासणी करून नंतर व्यवसाय-दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे. यासाठी कोरोना तपासणीची मोहीम राबवण्यात येत आहे. असे निर्देश देखील जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.

===Photopath===

240221\242_bed_21_24022021_14.jpg~240221\242_bed_22_24022021_14.jpg

===Caption===

बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, उपायुक्त सुरेश बेदमुथ्था, सीईओ अजित कुंभार, आदी ~जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित अधिकारी कर्मचारी 

Web Title: Corona should be prepared by the administration in the background - Ravindra Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.