Corona positive from Parli woman who came to Aurangabad for treatment | उपचारासाठी औरंगाबादेला आलेली परळीची महिला कोरोना पॉझिटिव्ह

उपचारासाठी औरंगाबादेला आलेली परळीची महिला कोरोना पॉझिटिव्ह

ठळक मुद्देमहिलेच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तयार

बीड/परळी: परळी येथील एक ५७ वर्षीय महिला शुक्रवारी औरंगाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्याप्रमाणे परळी शहरात संपर्क शोधणे व कंटेनमेंट झोन तयार करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. 

परळी शहरातील एका महिलेस किडणीचा आजार आहे. त्यामुळे २ जून रोजी ती लातूर येथील एका रुग्णालयात गेली. तेथून तिला औरंगाबादला रेफर केले. औरांगाबादमध्ये या महिलेचा स्वॅब घेण्यात आला. शुक्रवारी याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत औरंगाबादच्या आरोग्य विभागाने बीड आरोग्य विभागाला माहिती कळविली आहे. त्याप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व परळी तालुक्यातील आरोग्य विभागा कामाला लागला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व कंटेनमेंट झोन तयार करण्याची कारवाई उशिरापर्यंत सूरू होती. 

महिलेला प्रवासाचा इतिहास नाही
या महिलेचा संपर्क शोधण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू आहे. सध्या तरी या महिलेला प्रवासाचा इतिहास नसल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी तयार केली जात आहे. या महिलेला प्रवासाचा इतिहास नसेल तर आरोग्य विभागासमोर तिला कोरोनाची लागन नेमकी कोठे झाली? हे शोधण्याचे आव्हाण असणार आहे.

बीडमध्येही एक पॉझिटिव्ह
धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती शुक्रवारी  कोरोना पॉझिटिव्हा आला. १४ मे रोजी तो कुटूंबियांसह मुंबईहून गावी आला होता. आजारी असल्याने तो माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. नंतर अंबाजोगाईला रेफर करून स्वॅब घेतला असता पॉझिटिव्ह आला.

Web Title: Corona positive from Parli woman who came to Aurangabad for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.