कोरोनात लागले २७ कोटी लीटर ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:50 IST2021-01-08T05:50:15+5:302021-01-08T05:50:15+5:30

बीड : कोरोनाकाळात रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पाण्यासारखा झाल्याचे समोर आले आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या नऊ महिन्यात तब्बल ...

Corona needs 27 crore liters of oxygen | कोरोनात लागले २७ कोटी लीटर ऑक्सिजन

कोरोनात लागले २७ कोटी लीटर ऑक्सिजन

बीड : कोरोनाकाळात रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पाण्यासारखा झाल्याचे समोर आले आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या नऊ महिन्यात तब्बल २७ कोटी ५० लाख लीटर ऑक्सिजन लागले आहे. यात ३९ हजार जम्बो सिलिंडर तर ८५६ मीडियम सिलिंडरचा समावेश आहे. यासाठी आरोग्य विभागाचा ४० लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

जिल्ह्यात ८ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आष्टी तालुक्यात आढळला. तेव्हापासून जिल्ह्यात कोरोना संशयित आणि बाधितांची संख्या वाढत गेली. संशयित व बाधित रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ऑक्सिजन लावला जात असे. त्यामुळे मागणी वाढली होती. आरोग्य विभागाने सुरुवातील बीड व लातूर येथील कंपनीला याचे कंत्राट दिले. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची उच्चांक गाठला होता. खाटा आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. परंतु तत्काळ आरोग्य संस्थेतच ऑक्सिजन निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. असे असले तरी खासगी संस्थांकडून तब्बल ७ हजार लीटरचे ३९ हजार २५८ जम्बो सिलिंडर तर १,२३० लीटर क्षमतेचे ८५६ सिलिंडर लागले. यासाठी आरोग्य विभागाने ४० लाख ६९ हजार २९ रुपये खर्च केले. त्यातच ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात एका एजन्सीने जम्बो सिलिंडरचे दर वाढल्याने जादा भाव देण्याची मागणी केली. त्यामुळे या तीन महिन्याचा खर्च अद्याप अदा झालेला नाही.

कोट

कोरोना संशयित आणि बाधितांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना ऑक्सिजन देणे गरजेचे असते. त्यामुळेच कोरोना काळात ऑक्सिजनची मागणी वाढली होती. आता रुग्णसंख्या कमी झाल्याने ऑक्सिजनची मागणीही कमी होत आहे.

डॉ.आर.बी. पवार

जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

-----

ठळक आकडेवारी

कलावधी - एप्रिल ते डिसेंबर २०२०

एवढा लीटर ऑक्सिजन लागला - २७,५९,३५,९२०

झालेला खर्च - ४०,०९,२४९

-------

ऑक्सिजनची महिनानिहाय मागणी व खर्च

महिना जम्बो सिलिंडर खर्च मीडियम सिलिंडर खर्च

एप्रिल ८७ १५४८६ १०० १०५००

मे २९ ५१६२ १०० १०५००

जून ५०० १२२५०० १०० १०५००

जुलै २००० ४९०००० १०० १०७५२

ऑगस्ट २५०० ६१२५०० ८४ ९०३२

सप्टेंबर ११२८० २७६३६०० ७४ ७९५६

ऑक्टोबर १०९०८ - १५९ १७०९६

नोव्हेंबर ९३१४ - ६६ ७०९६

डिसेंबर २६४० - ७३ ७८४९

Web Title: Corona needs 27 crore liters of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.