कोरोना पुन्हा शतकपार; १२२ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST2021-03-08T04:31:23+5:302021-03-08T04:31:23+5:30
जिल्ह्यात गत आठवडाभरापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत चालली आहे. रविवारी जिल्ह्यातील १२२२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ११०० जणांचे ...

कोरोना पुन्हा शतकपार; १२२ रुग्णांची भर
जिल्ह्यात गत आठवडाभरापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत चालली आहे. रविवारी जिल्ह्यातील १२२२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ११०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १२२ बाधित निष्पन्न झाले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ५१, आष्टी व अंबाजोगाई तालुक्यात प्रत्येकी १६, गेवराई १२, केज १०, धारूर व वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक परळी व पाटोदा तालुक्यांत प्रत्येकी चार, शिरूर पाच व माजलगाव तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. रविवारी ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १९ हजार ३४६ इतका झाला आहे. पैकी १८ हजार ३१५ जण कोरोनामुक्त झाले असून, ५८७ जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.