दिल्लीतील किसान मोर्चासाठी १०० वाहनांचा ताफा रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:28 IST2021-01-04T04:28:08+5:302021-01-04T04:28:08+5:30
बीड : दिल्ली येथील ‘घेरा डालो, डेरा डालो’ या किसान आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ...

दिल्लीतील किसान मोर्चासाठी १०० वाहनांचा ताफा रवाना
बीड : दिल्ली येथील ‘घेरा डालो, डेरा डालो’ या किसान आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भागीदारी करण्यासाठी महाराष्ट्रातून १,५०० कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहेत. यापैकी एक जथा मुंबई, गुजरातमार्गे आणि दुसरा जथा नागपूर भोपाळमार्गे रावना झाला आहे. दिल्ली राजस्थानच्या शहजहाँपूर सीमेवर हे दोन्ही जथे एकत्र येऊन किसान आंदोलनाच्या महामोर्चामध्ये सामील होणार आहेत.
किसान सभेच्या या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. नामदेव गावडे करत असून, मराठवाड्यातून कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. राम बाहेती, कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. ज्योतिराम हुरकुडे, बीडमधून किसान सभेच्या या रॅलीमध्ये १० किसान कार्यकर्ते मार्गस्थ झाले आहेत. १०० जीपगाड्या आणि एक खाजगी बस असा लवाजमा दिल्लीकडे रवाना झाला. दिशाभूल करून भांडवलधार्जिणी धोरणे देशाच्या माथी मारू दिली जाणार नाहीत, असा ठाम विश्वास किसान सभेचे कॉ. नामदेव चव्हाण यांनी व्यक्त केला.