गेवराईत डाक विभागाचा महामेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST2021-01-09T04:28:02+5:302021-01-09T04:28:02+5:30
बीड येथील डाक अधीक्षक शामसुंदर शास्त्री तसेच येथील सहायक अधिकारी संजय आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील डाक कार्यालयात (पोस्ट ऑफिस) ...

गेवराईत डाक विभागाचा महामेळावा
बीड येथील डाक अधीक्षक शामसुंदर शास्त्री तसेच येथील सहायक अधिकारी संजय आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील डाक कार्यालयात (पोस्ट ऑफिस) येथे शासनाच्या विविध योजना डाक जीवन विमा, ग्रामीण डाक जीवन विमा, अल्प पेन्शन योजना, सुकन्या समृध्दी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योत तसेच आधार नूतनीकरण व दुरूस्तीसह विविध योजनांचा नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी डाक विभागाच्या वतीने विशेष डाक मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. यात शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक मोठा सहभाग घेत आहेत. मेळाव्यात विविध योजनेच्या लाभधारकांना कार्ड वाटप करण्यात येत आहे. यासाठी येथील येथील डाक विभागाचे डाक सहायक संजय आंबेकर, सहपोस्टमास्टर अतुल कुलकर्णी,फेरोज पठाण, शीतल घुगे, प्रतिभा दाभाडे, रोहिणी फड, धनंजय शेंडगे आदी परिश्रम घेत आहेत. या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन डाक विभागाने केले आहे.
( सोबतचा फोटो विविध योजनेच्या कार्डाचे वाटप करताना डाक कार्यालयातील )