शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मावेजा प्रकरणी दुसऱ्यांदा अवमान याचिका; सचिवासह बीड जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 13:00 IST

१५ वर्षापूर्वी, शिरुर कासार तालुक्यातील बहीरवाडी येथे गाव तलाव क्रमांक ६ साठी संतोष शिवनाथ बडे व इतरांची जमीन संपादीत केली होती.

बीड: एका मावेजा प्रकरणी अवमान याचिका दाखल झाल्यानंतर तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी मावेजा रक्कम पाच महिन्यात देऊ असे शपथपत्र औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतरही मावेजा मिळाला नसल्याने संबंधित शेतकऱ्याने पुन्हा नव्याने अवमान याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी ९ एप्रिल रोजी होणाऱ्या खंडपीठात सुनावणीसाठी  रोहयोचे अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना हजर राहण्या संदर्भात नोटीस बजावली आहे.

१५ वर्षापूर्वी, शिरुर कासार तालुक्यातील बहीरवाडी येथे गाव तलाव क्रमांक ६ साठी संतोष शिवनाथ बडे व इतरांची जमीन संपादीत केली होती. सदरील शेतकऱ्यांची जमीन पूर्वीचे संपादन अधिकारी ल.पा. बीड तसेच आताचे उपविभागीय अधिकारी बीड यांच्या कार्यालयात मावेजा मिळण्यासाठी अर्ज दिले, प्रत्यक्षात जाऊन मागणी केली, मात्र मावेजा देण्यात आला नाही. त्यानंतर संतोष बडे व इतर शेतकऱ्यांनी बीड जिल्हा न्यायालयातील ॲड. सुधीर कराड यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयातील औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. या प्रकरणी २५ ऑगस्ट २०२२ रोजी आदेश दिला की, संबंधित अर्जदारास ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मावेजा रक्कम देण्यात यावी, तसेच संपादीत संघ म्हणजेच बीड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संपूर्ण मावेजा रक्कम कोणताही वेळ वाया न घालवता तत्काळ बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करावी, असा आदेश देत ही याचिका निकाली काढली होती. 

दरम्यान, ३० नोव्हेंबर २०२३ उलटून गेला तरी संतोष बडे यांना मावेजा मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी वकीलाकडून अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर तत्कालिन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी शपथपत्र दाखल करुन ५ महिन्यात मावेजा रक्कम अदा करुन असे सांगितले. त्यामुळे ४ मार्च २०२४ रोजी अवमान याचिका निकाली काढली होत. परंतु ५ महिने उलटून गेले तरी मावेजा रक्कम मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा संतोष बडे यांनी पुन्हा दुसऱ्यांदा अवमान याचिका दाखल केली. सदरील प्रकरणी २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सुनावणी झाली. या प्रकरणी जलसंपादा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना हजर राहण्या संदर्भात नोटीस बजावली आहे. संतोष बडे यांच्यावतीने ॲड. सुधीर कराड, ॲड. योगेश्वर बिडवे काम पाहत आहे. पुढील सुनावणी ९ एप्रिल रोजी होणार आहे.

मावेजा प्रकरणांचे गांभीर्य नाहीजिल्हाधिकारी मावेजा प्रकरणाकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. माजलगाव न्यायालयाने मावेजा प्रकरणी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची कार जप्त केली होती तर अन्य एका प्रकरणात जिल्हाधिकारी पाठक यांना अटक करण्याचा आदेश दिला होता. अटकेचा आदेश निघाल्यानंतर तत्काळ संबंधित शेतकऱ्यास मावेजा देण्यात आला होता.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ