अवाजवी वीजबिलामुळे ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:52+5:302021-06-27T04:21:52+5:30
बीड : गेल्या अनेक दिवसांपासून जे वीजबिल दिले जात आहे, ते अनेकदा रीडिंग न घेताच दिले जात असल्याची तक्रार ...

अवाजवी वीजबिलामुळे ग्राहक त्रस्त
बीड : गेल्या अनेक दिवसांपासून जे वीजबिल दिले जात आहे, ते अनेकदा रीडिंग न घेताच दिले जात असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामीण भागात तर हा प्रकार सर्रास सुरू आहे. अवाजवी वीजबिलाबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. विद्युत अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्याची मागणी आहे.
घंटागाडीअभावी कचऱ्याचे ढीग साचले
अंबेजोगाई : शहरातील भटगल्ली, जैनगल्ली परिसरात येणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा पडून राहत आहे. गाडी नियमित व वेळेवर सोडून जागोजागी स्वच्छतेची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
खोलीकरण गरजेचे
अंबेजोगाई : तालुक्यातील बर्दापूर, नांदगाव, सुगांव या परिसरात असणाऱ्या पाझर तलावाचे खोलीकरण करावे. या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असला, तरी या परिसरातील तलाव कोरडे पडू लागले आहेत. या तलावांच्या खोलीकरणाची मागणी होत आहे.
अंमलबजावणी होईना
बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले, तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
बस सुरू करा
अंबेजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झाली नाही. बस सुरू न झाल्याने प्रवाशांना रिक्षा व इतर वाहनांतून प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागात बस सुरू करण्याची मागणी होत आहे.