ग्राहकदिनी जनजागृतीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:17 IST2020-12-28T04:17:49+5:302020-12-28T04:17:49+5:30
अंभोरा : राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटनेच्या वतीने आष्टी तालुक्यातील कडा येथे ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ...

ग्राहकदिनी जनजागृतीचा संकल्प
अंभोरा : राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटनेच्या वतीने आष्टी तालुक्यातील कडा येथे ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ग्राहकांची होणारी फसवणूक कमी करून ग्राहकांचे सर्वोच्च हित जोपासणाऱ्या ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू, असे जिल्हाध्यक्ष महादेव झेंडे यांनी सांगितले. यावेळी आष्टी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब काळे, तालुका उपाध्यक्ष खाकाळ आणि शिवाजी धुमाळ उपस्थित होते. ग्राहक सेवेसाठी आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी एक सामायिक विचार घेऊन आपण एकत्र आलेलो आहोत. ग्राहकांची विविध मार्गाने होत असलेली फसवणूक टाळणे व त्यांना सजग करून न्याय मिळवून देणे हे ग्राहक चळवळीत सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे वक्त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकारिणी सदस्य, विभागीय समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.