शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मंजरथ शाळेचे नळ कनेक्शन २२ पर्यंत जोडण्याचे ग्रामपंचायतीस आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 18:18 IST

शाळेचे नळ कनेक्शन तोडल्याप्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांना दोन दिवसात खुलासा देण्याबाबत तहसीलदारांची तंबी

ठळक मुद्देतहसीलदारांच्या मध्यस्थीने आंदोलन मागेविद्यार्थ्यांना पुढे करून अशी आंदोलने करू नयेत, अशी शाळेस समज

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील दक्षिण काशीमधील गोदावरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पिण्यासाठी पाणी द्या म्हणून पंचायत समितीसमोर चालू केलेले आंदोलन अखेर दुसऱ्या दिवशी येथील तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्या तंबीपूर्ण मध्यस्थीने सुटले. यावेळी त्यांनी नळ कनेक्शन ग्रामपंचायतने तोडल्याप्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांना दोन दिवसात खुलासा देण्याबाबत तंबी दिली. तसेच खुलासा समाधानकारक न आल्यास सरपंचावर अपात्रतेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. 

गोदावरी विद्यालय मंजरथ या शाळेला १९८४ पासून नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ग्रामपंच्यातच्या अनेक सदस्यांची मुले या शाळेत शिक्षण घेतात. ग्रामपंचायतअंतर्गत चाललेल्या परस्पर विरोधी राजकारणाने शाळेच्या पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून चंचू प्रवेश प्रवेश केला आणि नेमकी माशी येथेच शिंकली. यावर विद्यार्थी त्यांचे  पालक आणि सरपंच यांनी मागील दोन दिवसांत आपापल्या प्रतिष्ठेपायी पंचायत समितीसमोर उच्च प्रतिशोध नाट्य घडवून आणले. या नाट्यावर अखेर येथील तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी योग्य व तंबीपूर्ण भूमिका घेऊन तोडगा काढत पडदा पाडला. यात त्यांनी २२ जुलैपर्यंत ग्रामपंचायतने शाळेला असलेले नळ कनेक्शन सुरू करून द्यावे तसेच तोपर्यंत विद्यार्थाना जारने पिण्यासाठी पाणी पुरवावे, असे ठरले. जे ग्रामपंचायतने मान्य केले तसेच शाळेने देखील विद्यार्थ्यांना पुढे करून अशी आंदोलने करू नयेत, अशी समज शाळेला  देण्यात आली.

या बैठकीच्या वेळी आंदोलनकर्त्यांसह संस्थेचे सचिव अजय बुरांडे, बाजार समिती सभापती अशोक डक, पं.स. उपसभापती डॉ. वसीम मनसबदार, जयदत्त नरवडे, गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण शहर ठाण्याचे पो.नि. सय्यद सुलेमान, ग्रामीण  ठाण्याचे पी.आय. सुरेश बुधवंत उपस्थित होते. या आंदोलनाला माजीमंत्री प्रकाश सोळंके, नगरसेवक दीपक मेंडके, शरद यादव, काँग्रेसचे शेख अहेमद , कॉ. मुसद्दीक बाबा, कॉ. दत्ता डाके, कॉ. शिवाजी कुरे आदींनी भेटी दिल्या. या आंदोलनामुळे दिवसभर पंचायत समिती कार्यालय बंद राहिले. 

ग्रामपंचायतने शाळेचा पाणीपुरवठा तोडला या प्रकरणी मानवीय दृष्टीकोन आणि नियम यांचा समतोल राखण्यासाठीची भूमिका घेत नोटिसद्वारे सरपंच आणि ग्रामसेवकांना दोन दिवसांत खुलासा मागविला आहे. याचा समाधानकारक खुलासा न आल्यास सरपंचांविरु द्ध अपात्रतेचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. - डॉ. प्रतिभा गोरे, तहसीलदार माजलगाव.

टॅग्स :WaterपाणीSchoolशाळाBeedबीडStudentविद्यार्थीTahasildarतहसीलदार