पंतप्रधान मोदींच्या अघोषित आणीबाणीला काँग्रेसचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:51+5:302021-06-27T04:21:51+5:30
: काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारचा निषेध लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी म्हणजेच ‘सामाजिक ...

पंतप्रधान मोदींच्या अघोषित आणीबाणीला काँग्रेसचा विरोध
: काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी म्हणजेच ‘सामाजिक न्याय दिनी’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अघोषित आणीबाणीच्या विरोधात अंबाजोगाई येथे शनिवारी सकाळी ११ वाजता काँग्रस पक्षातर्फे आंदोलन करून काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी ओबीसींच्या आंदोलनालाही समर्थन देऊन जिल्हाभर जनआंदोलन केले.
ओबीसींच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे शनिवारी (२६ जून) बीड जिल्ह्यात सर्वत्र जनआंदोलन करण्यात आले. आंदोलनात युवक, महिला, काँग्रेस पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते, अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.
प्रारंभी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबाजोगाईतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राजकिशोर मोदी म्हणाले, २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अघोषित आणीबाणी विरोधात बीड जिल्ह्यातील गाव, शहर, तालुका येथे जनआंदोलन झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्याचे पापदेखील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचेच आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसींची आकडेवारी केंद्रातील भाजप सरकारकडे मागितली होती. परंतु, त्यांनी ती दिली नाही. त्यामुळेच ओबीसींचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. याला सर्वस्वी महाराष्ट्रातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा त्यांनी आरोप केला.
जनआंदोलनात अध्यक्ष राजकिशोर मोदी, अॅड. विष्णुपंत सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, महादेव आदमाने, मनोज लखेरा, अमोल लोमटे, वाजेद खतीब, सुनील व्यवहारे, धम्मपाल सरवदे, राणा चव्हाण, सुनील वाघाळकर, गणेश मसने, सज्जन गाठाळ, शेख मुख्तार यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
...
केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
जनआंदोलनप्रसंगी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणीचा निषेध केला. ओबीसींच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे. ‘प्रत्येकावर होतेय दडपशाही, हीच तर मोदी सरकारची हुकूमशाही..’ अशा घोषणाही दिल्या. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. नरेंद्र मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणी विरोधात अॅड. विष्णुपंत सोळंके यांनी उपस्थितांना ‘संविधान रक्षणाची शपथ’ दिली. काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारचा निषेध केला.
===Photopath===
260621\avinash mudegaonkar_img-20210626-wa0078_14.jpg
===Caption===
पंतप्रधान मोदी यांच्या अघोषित आणीबाणी विरोधात काँग्रस पक्षातर्फे आंदोलन करुन काळे झेंडे दाखवून निषेध केला.