काँग्रेसतर्फे गरजूंना किराणा साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST2021-06-21T04:22:26+5:302021-06-21T04:22:26+5:30
अंबाजोगाई : येथे युवक काँग्रेसतर्फे गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी संकल्प दिन म्हणून साजरा ...

काँग्रेसतर्फे गरजूंना किराणा साहित्य वाटप
अंबाजोगाई : येथे युवक काँग्रेसतर्फे गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे बीड जिल्हा प्रभारी राहुल संत, जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत पवार, सचिन जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यशवंतराव चव्हाण चौक परिसरात आणि शहरातील इतरही ठिकाणी वास्तव्यास असलेल्या ५० गरजू कुटुंबीयांना किराणा साहित्याचे वाटप केले. या वेळी सुनील नागरगोजे, महादेव आदमाने, मनोज लखेरा, वाजेद खतीब, सुनील व्यवहारे, धम्मपाल सरवदे, भारत जोगदंड, प्रताप देवकर, अमोल मिसाळ हेही उपस्थित होते.
===Photopath===
200621\avinash mudegaonkar_img-20210620-wa0061_14.jpg