ऑलिम्पिक खेळाडूंना स्वाक्षरी माेहिमेद्वारे शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:52+5:302021-07-19T04:21:52+5:30
क्रीडा विभागाचा कार्यक्रम : अधिकारी, खेळाडूंसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश बीड : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत निवड झालेल्या राज्य व ...

ऑलिम्पिक खेळाडूंना स्वाक्षरी माेहिमेद्वारे शुभेच्छा
क्रीडा विभागाचा कार्यक्रम : अधिकारी, खेळाडूंसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश
बीड : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत निवड झालेल्या राज्य व देशातील खेळाडूंना स्वाक्षरी करून शुभेच्छा देण्यात आल्या. क्रीडा विभागाने हा कार्यक्रम घेतला होता. यावेळी अधिकारी, खेळाडूंसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
जपान देशातील टोकियो शहरात २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. यात बीडच्या अविनाश साबळे याच्यासह राही सरनोबत ( शूटिंग २५ मी. पिस्तूल), तेजस्विनी सावंत (शुटिंग ५० मी. थ्री.पी.), प्रवीण जाधव (आर्चरी रिकव्र्ह), विराग शेट्टी (बॅडमिंटन दुहेरी - पुरुष), विष्णू सरवान्नन्न (सेलिंग लेरार स्टँडर्ड क्लास) उदयन माने (गोल्फ), स्वरूप उन्हाळकर (पॅरा शूटिंग १० मी. रायफल), सुयश जाधव (पॅरा जलतरण ५० मी. बटरफ्लाय, २०० मी. वैयक्तिक मिडले), भाग्यश्री जाधव (पॅरा ॲथलेटिक्स गोळाफेक) या १० खेळाडूंची निवड झालेली आहे. या सर्व खेळाडूंना स्वाक्षरी करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, शिक्षणाधिकारी विक्रम सारूक, ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रा. जे. पी. शेळके, जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद विद्यागर, सुप्रिया गाढवे, संघटक अविनाश बारगजे, विनायक वझे, शरद आंदुरे, तत्त्वशील कांबळे, उत्तरेश्वर सपाटे, पवार, प्रदीप डोंगरे व क्रीडा कार्यालयाचे योगेश आवढाळ, रमाकांत डिंगणे, ज्ञानेश्वर धंडारे, सचिन जाधव, किशोर काळे, रवी घुमरे, आदी उपस्थित होते.
170721\543917_2_bed_24_17072021_14.jpeg
स्वाक्षरी करून खेळाडूंना शुभेच्दा देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अरविंद विद्यागर, अविनाश बारगजे, तत्वशील कांबळे आदी.