कृषी महाविद्यालयाच्या शिवारफेरीचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:31 IST2021-08-01T04:31:00+5:302021-08-01T04:31:00+5:30

अंबाजोगाई : येथील कृषी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवार फेरीचा समारोप शनिवारी झाला. यावेळी डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी मार्गदर्शन ...

Conclusion of Shivarpheri of Agriculture College | कृषी महाविद्यालयाच्या शिवारफेरीचा समारोप

कृषी महाविद्यालयाच्या शिवारफेरीचा समारोप

अंबाजोगाई : येथील कृषी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवार फेरीचा समारोप शनिवारी झाला. यावेळी डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी मार्गदर्शन केले.

कृषी महाविद्यालयाच्यावतीने आठवड्यात एक दिवस शहरातील मान्यवर व्यक्तींना शिवार फेरी या उपक्रमात बोलावून संपूर्ण महाविद्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात येते. या उपक्रमात आनंदघन वृक्ष प्रकल्प, जांभूळ बन, पिंपळ बन, वड बन, गुलाब गार्डन, पीक प्रात्यक्षिक प्रकल्प, योगा गार्डन आदी विविध उपक्रमांची माहिती देऊन शिवाय फेरी पूर्ण करण्यात आली.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन रापतवार उपस्थित होते. फेरीत कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. बसलिंगाप्पा कलालबंडी, प्रक्षेत्र अधीक्षक प्रा. डॉ. योगेश वाघमारे, प्रा. मन्मथ बेरकीले, प्रा. धीरज पाथरीकर, कळसकर, राजेश येवले व मान्यवर उपस्थित होते.

310721\img-20210730-wa0054.jpg

Web Title: Conclusion of Shivarpheri of Agriculture College