‘जलयोग संकल्पना समाजात रुजली पाहिजे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST2021-06-22T04:23:04+5:302021-06-22T04:23:04+5:30
अंबाजोगाई : ज्या प्रमाणे जमिनीवर योगासने केली जातात त्याच धर्तीवर पाण्यामध्ये तरंगत जलयोगही सहजपणे करता येतो. ही प्रक्रिया सहज ...

‘जलयोग संकल्पना समाजात रुजली पाहिजे’
अंबाजोगाई : ज्या प्रमाणे जमिनीवर योगासने केली जातात त्याच धर्तीवर पाण्यामध्ये तरंगत जलयोगही सहजपणे करता येतो. ही प्रक्रिया सहज व सोपी आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध जलयोग योगगुरू प्रा. डॉ. आर. एम. हजारी यांनी केले.
येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात सोमवारी क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. माणिकराव लोमटे उपस्थित होते. या वेळी ‘जलयोग’ या विषयावर प्रा. डॉ. हजारी यांनी मार्गदर्शन केले. या जलयोगाने शरीर, मन व आत्मा या शरीरातील अवयवांना बलवान करते, असे सांगून जलयोगाला सर्व स्तरातून लोकांची व योगधारकांची संमती तसेच पसंती असल्याचे ते म्हणाले. प्रा. लोमटे म्हणाले, योगामुळे शरीरातील अवयवांना बळकटी व मजबुती मिळते तसेच अनेक रोग नष्ट होतात. प्रास्ताविकात क्रीडाविभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोसले यांनी योग व जलयोगाविषयी अभ्यासपूर्ण पार्श्वभूमी विशद केली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. किरण चक्रे यांनी केले. प्रा. डॉ. डी. एल. सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य, प्रा. व्ही. जी. राजपूत, प्राध्यापिका, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
210621\avinash mudegaonkar_img-20210621-wa0084_14.jpg