कोरोनाच्या उच्चाटनासाठी महायागाची पूर्णाहुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST2021-06-03T04:24:15+5:302021-06-03T04:24:15+5:30
शिरूर कासार : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनार्थ सिद्धेश्वर संस्थानवर महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी तीन ...

कोरोनाच्या उच्चाटनासाठी महायागाची पूर्णाहुती
शिरूर कासार : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनार्थ सिद्धेश्वर संस्थानवर महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी तीन दिवसीय महायाग यज्ञ सुरू केला होता. या यज्ञाची बुधवारी पूर्णाहुती झाली. यावेळी केलेल्या संकल्पाचीदेखील पूर्ती झाली.
तीन दिवसीय यागाचे पौरोहित्य सुरेश कापरे व अमोल कापरे या पिता-पुत्रानी केले. तीन दिवसांत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आपली समिधा यज्ञदेवतेला समर्पित केली. महायागाची सुरुवात पोलीस उपनिरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांच्या उपस्थितीत झाली होती. कोरोना मुक्तीसाठी महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी भगवान सिद्धेश्वर व कालिका माता यांना साकडे घातले. यावेळी तहसीलदार श्रीराम बेंडे, नगरपंचायत मुख्याधिकारी किशोर सानप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी, नगराध्यक्षा मीरा गाडेकर, दत्ता गाडेकर, गोविंद पाटील, राम कांबळे, गोकुळ पवार, रामदास महाराज, हनुमान ढाकणे यांची उपस्थिती होती.
===Photopath===
020621\vijaykumar gadekar_img-20210602-wa0028_14.jpg
===Caption===
कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनार्थ सिध्देश्वर संस्थानवर पूर्णाहुती यज्ञाचे आयोजन केले होते. यावेळी पूजा करताना मान्यवर.