दिंद्रुड ठाण्यात तक्रारदारांनाच पोलिसांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:46+5:302021-08-28T04:37:46+5:30
भोपा येथील बाबूराव वाघचौरे व रामभाऊ वाघचौरे हे दोघे गावात झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गेले. तेथे ...

दिंद्रुड ठाण्यात तक्रारदारांनाच पोलिसांची मारहाण
भोपा येथील बाबूराव वाघचौरे व रामभाऊ वाघचौरे हे दोघे गावात झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांची बाजू समजून घेण्याऐवजी विष्णू घोळवे व सुरेवाड या दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना अरेरावी करत खोलीत कोंडले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार घडताच वाघचौरे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करून या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, हा प्रकार समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी ठाण्यात धाव घेत दोन तास ठिय्या मांडला. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
---
हा प्रकार मला माहीत नाही. मारहाणीच्या आलेल्या तक्रारीनुसार चौकशी केली जाईल. त्यानंतरच पुढील कारवाई करू.
- प्रभा पुंडगे, स.पो.नि. पोलीस ठाणे, दिंद्रुड