पेट्रोल, डिझेल दरवाढ, महागाईच्या विरोधात भाकपची बीडमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST2021-07-01T04:23:28+5:302021-07-01T04:23:28+5:30

बीड : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजप राजवटीने पेट्रोल - डिझेलची जीवघेणी दरवाढ केल्यामुळे एकूणच महागाईचा भडका उडाला आहे. ...

Communist Party of India (CPI) protests in front of District Collector's Office in Beed against petrol, diesel price hike and inflation. | पेट्रोल, डिझेल दरवाढ, महागाईच्या विरोधात भाकपची बीडमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली

पेट्रोल, डिझेल दरवाढ, महागाईच्या विरोधात भाकपची बीडमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली

बीड : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजप राजवटीने पेट्रोल - डिझेलची जीवघेणी दरवाढ केल्यामुळे एकूणच महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे. त्याचा तीव्र निषेध म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आणि मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले.

मोदी सरकारने शेतकरी आणि कामगार यांच्या विरोधात कायदे करून अगोदरच त्यांचे कंबरडे मोडले आहे. आता पुन्हा पेट्रोल - डिझेलची जीवघेणी दरवाढ करून सर्वसामान्य कष्टकऱ्यांना आर्थिक अरिष्टात ढकलले आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई मिळाली नाही आणि पीक कर्जही मिळत नाही. छोट्या व्यावसायिकांचा रोजगार नष्ट झाल्यामुळे बेकारांच्या संख्येत वाढ झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर निवेदनात दहा मागण्या केल्या आहेत. यामध्ये पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करा, खते बी-बियाणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या औषधी अवजारांच्या किमती कमी करा, शेतकरी कामगारविरोधी काळे कायदे रद्द करा, कर न भरणाऱ्या कुटुंबांना ७५०० दरमहा मदत करा, पीक विमा आणि पीक कर्ज त्वरित द्या, इत्यादी मागण्यांचा समावेश निवेदनामध्ये आहे.

आजच्या निदर्शनात कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. ज्योतिराम हुरकुडे, कॉ. भाऊराव प्रभाळे, कॉ. रामहरी मोरे, कॉ. दत्ता भोसले, कॉ. उत्तमराव सानप, कॉ. डी. जी. तांदळे, कॉ. राजकुमार कदम, कॉ. ॲड. करुणा टाकसाळ, कॉ. गोविंद साळवे, कॉ. शेरू भाई, कॉ. आसाराम मुळे, कॉ. सुनील भोसले, कॉ. सुधाकर डोळस, देविदास पवारसह माळीचिंचोली, बेलुरा, जिरेवाडी, तिपटवाडी, शिवनी, अंथरवण पिंपरी येथील शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने सामील झाले होते.

===Photopath===

300621\30_2_bed_4_30062021_14.jpg

===Caption===

माकपचा मोर्चा  

Web Title: Communist Party of India (CPI) protests in front of District Collector's Office in Beed against petrol, diesel price hike and inflation.