यशवंत विद्यालयात गुणगौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST2021-07-25T04:27:59+5:302021-07-25T04:27:59+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोविंदराव वाघ तर प्रमुख अतिथी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, प्रतिनिधी ...

Commendation ceremony at Yashwant Vidyalaya | यशवंत विद्यालयात गुणगौरव सोहळा

यशवंत विद्यालयात गुणगौरव सोहळा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोविंदराव वाघ तर प्रमुख अतिथी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, प्रतिनिधी प्रमोद ठोसर, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश वाघ, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एम. एस. धुमाळ हे उपस्थित होते.

यावेळी शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त प्रणव वाघ, द्वितीय क्रमांक ओमकार जानवळे, तृतीय क्रमांक अंशू राम दामोदर, सूरज भगत, रेणुका पिंगळे, माजी विद्यार्थी निलेश कागदे, महेश भांडवले, मयुरी वायचळ यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी साईनाथ ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात त्रिसूत्रीचे महत्व विशद करत व्यसन करू नका. आई-वडिलांची सेवा तसेच राष्ट्र सेवा यातून व्यक्तिमत्त्व संपन्न होते असे सांगितले. नानाभाऊ हजारे यांनी, विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे असे सांगत विविध उदाहरणे दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोविंदराव वाघ यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. बी. गाडेकर यांनी केले. एस. जी. गीते यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

240721\24bed_2_24072021_14.jpg

यशवंत विद्यालय

Web Title: Commendation ceremony at Yashwant Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.