आष्टीत कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:28 IST2021-01-17T04:28:58+5:302021-01-17T04:28:58+5:30
आष्टी: येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आ. सुरेश धस,आ. बाळासाहेब आजबे,सतिश शिंदे,तहसिलदार शारदा दळवी,गटविकास अधिकारी सुधाकर ...

आष्टीत कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात
आष्टी: येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आ. सुरेश धस,आ. बाळासाहेब आजबे,सतिश शिंदे,तहसिलदार शारदा दळवी,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर तालुक्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळवण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेला शनिवारी प्रारंभ झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात या मोहिमेचे उद्घाटन होऊन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय येथील सर्व आरोग्य अधिकारी,डाॅक्टर,नर्स व कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. शनिवारी दिवसभरात १०० कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहूल टेकाडे, डाॅ.रामदास मोराळे, डॉ प्रदीप अकोलकर, डाॅ.जावळे,डाॅ.निखिल गायकवाड,डाॅ.अमित डोके,डाॅ.शिवराज नवले,डाॅ.रुपाली राऊत,नागेश करांडे,संदिप धस व आदी कर्मचारी उपस्थित होते.