दिलासादायक; रुग्णसंख्येत घट होऊन मृत्यूही निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST2021-07-20T04:23:30+5:302021-07-20T04:23:30+5:30
जिल्ह्यातील ४ हजार ५३१ संशयितांचे कोरोना चाचण्यांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. यात ११३ पॉझिटिव्ह, तर ४ हजार ४१८ ...

दिलासादायक; रुग्णसंख्येत घट होऊन मृत्यूही निरंक
जिल्ह्यातील ४ हजार ५३१ संशयितांचे कोरोना चाचण्यांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. यात ११३ पॉझिटिव्ह, तर ४ हजार ४१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ५, आष्टी २५, बीड २८, धारूर ४, गेवराई ६, केज ७, माजलगाव १०, पाटोदा १२, शिरूर १० व वडवणी तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. परळीत दुसऱ्या दिवशीदेखील एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. सोमवारी दिवसभरात ११८ जण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. २४ तासांत एकही मृत्यू झाला नाही. आता एकूण बाधितांची संख्या ९४ हजार ९२५ इतकी झाली आहे. पैकी ९१ हजार ०२७ जण कोरोनामुक्त झाले असून, २ हजार ५७६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ३२२ रुग्ण उपचार घेत आहेत.