दिलासा ! आठवडी बाजार सुरू, दुकाने रात्री ९ पर्यंत उघडी राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 07:04 PM2020-10-16T19:04:52+5:302020-10-16T19:06:04+5:30

सणासुदीच्या दिवसांमुळे खरेदी- विक्रीत राहणार उत्साह

Comfort! The weekly market is open and the shops will be open till 9 pm | दिलासा ! आठवडी बाजार सुरू, दुकाने रात्री ९ पर्यंत उघडी राहणार

दिलासा ! आठवडी बाजार सुरू, दुकाने रात्री ९ पर्यंत उघडी राहणार

Next
ठळक मुद्देपरिस्थिती येणार पूर्वपदावर

बीड : कन्टेनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रात अभ्यासिका, पार्क, आठवडी बाजारासह काही बाबींना अटी व शर्तीसह गुरुवारपासून परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी परवानगी असणाऱ्या सर्व व्यवसाय, दुकानांना रात्री ९ वाजेपर्यंत कामकाज करता येणार आहे. बंदी आदेशातून सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनामध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतराचे बंधने पाळणे आवश्यक आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी राहूल रेखावार यांना दिले आहेत.

ग्रामीण भागात आठवडी बाजार सात महिन्यानंतर फुलणार आहेत. तर सर्वच दुकानांना रात्री ९ पर्यंत परवानगी मिळाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण, शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी ३१ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. तर १५ ऑक्टोबरपासून सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालय व अभ्यासिकांना कोविड नियम व सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करुन उघडण्यास परवानगी असेल. गार्डन, पार्क व इतर सार्वजनिक खुली ठिकाणे चालू राहतील. कन्टेनमेंट क्षेत्रा बाहेर केवळ व्यावसायिकांशी संबंधित प्रदर्शने चालू करण्यास परवानगी असेल. जिल्हयातील कन्टेनमेंट क्षेत्रा बाहेर स्थानिक आठवडी बाजार (जनावरांचे ) सुरु करण्यास परवानगी राहील. परवानगी असणाऱ्या सर्व व्यवसाय, दुकान, बाबींना रात्री ९ वाजेपर्यंत कामकाज करता येणार आहे. मात्र काेविडबाबतच्या नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक राहणार आहे.

ग्रामपंचायत, नगर पंचायत, पालिकेवर  जबाबदारी
आठवडी बाजारात सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाजीपाला, अन्य विक्रेते व ग्राहकांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. दोन व्यक्ती व विक्रेत्यांमध्ये ६ फूट अंतर असावे. विक्रेत्यांनी स्वत: दक्षता घ्यावी व ग्राहकांना नियमांचे पालन करण्यास सांगावे. उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करुन दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गुटखा, तंबाखू व पान, धुम्रपानास बंदी असेल.  ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायतने बाजार सुरु हाेण्याअाधी जागा सॅनिटाईझ करावी. विक्रेत्यांना बसण्यासाठी व ग्राहकांना उभे राहण्यासाठी खूणा निश्चित कराव्यात. प्रत्येक विक्रेत्याने हात सॅनिटायझ अथवा साबणाने स्वच्छ करावे. ताप, सर्दी खोकला, डोकेदुखी, श्वसत्रास असणाऱ्यांनी बाजारात यायचे टाळावे.

Web Title: Comfort! The weekly market is open and the shops will be open till 9 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.