योद्ध्यांना दिलासा ; दोन दिवसांत येणार दर्जेदार पीपीई कीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST2021-04-02T04:35:51+5:302021-04-02T04:35:51+5:30
लोकमत इम्पॅक्ट बीड : कोरोना वॉर्डमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी सद्यस्थितीत पीपीई कीट त्रासदायक ठरत होत्या. याबाबत 'लोकमत'ने वृत्त ...

योद्ध्यांना दिलासा ; दोन दिवसांत येणार दर्जेदार पीपीई कीट
लोकमत इम्पॅक्ट
बीड : कोरोना वॉर्डमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी सद्यस्थितीत पीपीई कीट त्रासदायक ठरत होत्या. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासह पाठपुरावा केला. आता याला यश आले असून पुढील दोन दिवसांत दर्जेदार कीट उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी गुरुवारी 'लोकमत'ला दिली.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मनुष्यबळही अपुरे पडत आहे. असे असतानाही डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक, कर्मचारी हे कर्तव्य बजावतात. परंतु, त्यांच्यासाठी असलेल्या पीपीई कीट (पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्यूपमेंट) खूपच त्रासदायक ठरत होत्या. याबाबत कर्मचाऱ्यांनी 'साहेब, कोरोनाने नव्हे तर पीपीई कीटने मरू' अशी भावना व्यक्त करीत कीट बदलण्याची मागणी केली होती. हा प्रकार लोकमतने वृत्त प्रकाशित करून समोर आणला. त्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी धुलिवंदनाच्या दिवशी रात्री अचानक वॉर्डमध्ये जावून आढावा घेतला. यावेळीही कर्मचाऱ्यांनी बाकी काही नको, फक्त कीट बदला, असा सूर लावला.
जिल्हाधिकारीही केवळ २० मिनिटांत घामाघूम झाले होते. यावरून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजले. हे सर्व मुद्दे लोकमतने मांडले होते. यावर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. तात्काळ जुन्या कीटची आवक बंद करून नवीन कीटची मागणी केली. पुढील दोन दिवसांत या नव्या कीट येणार असल्याचे शल्य चिकित्सक डॉ.गित्ते यांनी सांगितले. आता येणाऱ्या कीट या पूर्वीप्रमाणेच त्रास न होणाऱ्या असल्याचे सांगितले. नव्या कीट आल्यानंतर जुन्या कीटचा वापर पूर्णपणे बंद केला जाणार असल्याचेही डाॅ.गित्ते म्हणाले.
'लोकमत'मुळे प्रश्न मार्गी
कोरोना वाॅर्डमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पीपीई कीटबाबतचा गंभीर प्रश्न सर्वात आगोदर लोकमतने समोर आणला. त्याचा पाठपुरावाही केला. आता याला यश मिळत आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गित्ते यांनी नव्या कीट दोन दिवसांत येणार असल्याचेही सांगितले. अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांसाठी 'लोकमत' पुन्हा एकदा धावून गेले आणि त्यांची मागणी पूर्ण करण्यास मदत केली. यामुळे कर्मचाऱ्यांमधूनही 'लोकमत'बद्दल समाधान व्यक्त होत आहे.
===Photopath===
010421\012_bed_16_01042021_14.jpg~010421\012_bed_15_01042021_14.jpg
===Caption===
लोकमतने वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी कोरोना वॉर्डमध्ये जावून राऊंड घेतला. यावेळीही कर्मचाऱ्रूांनी कीटबद्दलच भावना व्यक्त केला. याचे वृत्त ३१ मार्च रोजी प्रकाशित केले होते. ~कर्मचाऱ्यांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहचविल्याचे वृत्त लोकमतने २९ मार्च रोजी प्रकाशित केले होते.