देर आये, दुरुस्त आये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:30 IST2021-03-08T04:30:55+5:302021-03-08T04:30:55+5:30

सतीश जोशी बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी या आठवड्यात चार दिवस परळी मतदार संघात मुक्कामच ठोकला नाही ...

Come late, come right ... | देर आये, दुरुस्त आये...

देर आये, दुरुस्त आये...

सतीश जोशी

बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी या आठवड्यात चार दिवस परळी मतदार संघात मुक्कामच ठोकला नाही तर चक्क पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकींचा सपाटा लावला. मतदारसंघातील बुथ रचना समितीच्या बैठकांमधून त्यांनी संघटना बांधणी करण्यावर या चार दिवसांत भर दिला होता. परळी ग्रामीणचे केंद्रप्रमुख व प्रभारींची बैठक घेऊन त्यांनी मतदार संघाचा आढावा घेतला. परळी विधानसभा मतदार संघातून पराभूत झाल्यापासून जवळपास त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघाचाच काय, बीड जिल्ह्याचाही संपर्क कमी केला होता. कोरोनाचे वातावरण, लॉकडाऊनही त्यांच्या पथ्यावर पडले. कोरोनाचीच भीती इतकी होती की, संकटात असलेल्या मतदारांनाही त्या मतदारसंघात आलेल्या नाहीत, हेच लक्षात आले नाही. पराभवानंतर गोपीनाथगडावर त्यांनी प्रथमच जाहीर कार्यक्रम घेऊन जनतेसमोर आल्या होत्या. परंतु, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या साक्षीने या कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत आल्या होत्या. बीड जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या वेळीही परदेश दौरा काढल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद ताब्यात घेऊन मागच्या पराभवाचे उट्टे काढले होते. राष्ट्रसंत भगवानबाबांचे जन्मगाव सावरगाव येथील दसरा मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी जनसंपर्काचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यास कोरोना महामारीचे बंधन होते. त्यानंतर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ त्यांनी काही बैठका घेऊन सोपस्कार पूर्ण केले. कारण या उमेदवारीवर त्यांनी उमेदवारी अर्ज भरतानाच जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या दोन तीन गोष्टी सोडल्यानंतर पंकजा मुंडे या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या फारशा संपर्कात नव्हत्या. परिणामत: जिल्ह्यात भाजप बॅकफूटवर गेली आणि याचा फायदा उचलत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील, विशेषत: परळी मतदार संघातील जनसंपर्क वाढवत आपले नेतृत्व आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला, करत आहेत. आरोप - प्रत्यारोपाने न खचता धनंजय मुंडे यांची चाललेली यशस्वी घोडदौड निश्चितच पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यातील भावी राजकारणासाठी बाधा आणणारी आहे, हेही तितकेच खरे.

सत्तेत असताना पंकजा मुंडे यांच्याभोवती असणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आता हळूहळू दूर जाताना दिसत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची ही नाराजी ओळखून धनंजय मुंडे यांनी त्यांच्याशी संपर्क वाढवला आहे. लढायचे तर कुणाच्या जीवावर? हा प्रश्न या भाजप निष्ठावंतांच्या समोर होता. याउलट कोरोनाकाळातही धनंजय मुंडेंचा जनता दरबार अडलेल्या, नडलेल्या कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या ‘भाऊ’गर्दीने ओसंडून जात आहे. सत्तेत नसताना आणि आता असतानाही धनंजय मुंडेंनी जनतेशी असलेली नाळ तोडली नाही तर ती आता अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ लागले. त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधू लागले. ही बाब पंकजा मुंडे यांच्या भावी राजकारणासाठी निश्चितच बाधा आणणारी आहे, हे सांगण्यासाठी कुणा सल्लागाराची गरज नाही. तसेही चांगले सल्ले ऐकून घेतले जात नाहीत, अशी अनुभवी निष्ठावंतांची पंकजा यांच्याबाबतची ओरड आजही कायम आहे. जिल्ह्यात तुमची, पक्षाची किती ताकद आहे, यावर राज्यात, राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा, महत्त्व वाढत असते, हेही तितकेच खरे.

===Photopath===

070321\072_bed_5_07032021_14.jpeg

===Caption===

पंकजा मुंडे

Web Title: Come late, come right ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.