जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सरकारी रुग्णालयाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST2021-08-17T04:39:19+5:302021-08-17T04:39:19+5:30

जिल्हाधिकारी म्हणून राधाबिनोद शर्मा नुकतेच रुजू झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. सुरुवातीला त्यांनी पोर्टेेबल केबिनचे उद्घाटन ...

The Collector reviewed the government hospital | जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सरकारी रुग्णालयाचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सरकारी रुग्णालयाचा आढावा

जिल्हाधिकारी म्हणून राधाबिनोद शर्मा नुकतेच रुजू झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. सुरुवातीला त्यांनी पोर्टेेबल केबिनचे उद्घाटन केले. या केबिनमधून ॲडमिशन, ओपीडी पेपर देण्यासह कोरोना चाचणी करण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे गर्दीची समस्या दूर होणार आहे. तसेच त्यांनी संशयित व बाधित रुग्णांच्या वॉर्डात जाऊन पाहणी केली. आयसीयू १ मधून त्यांनी बंगलोरच्या फिजीशियनशी संवाद साधून माहिती घेतली. त्यानंतर व्हीआरडीएल प्रयोगशाळेचीही पाहणी करून माहिती घेतली. त्यांचा जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने डाॅ. सुरेश साबळे यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. महेश माने, डॉ. सचिन आंधळकर, डॉ. राम आवाड, डॉ. जयश्री बांगर, डॉ. गुट्टे, आदींची उपस्थिती हाेती.

160821\16_2_bed_10_16082021_14.jpeg

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्याकडून आढावा घेतला. सोबत डॉ.सुखदेव राठोड आदी दिसत आहेत.

Web Title: The Collector reviewed the government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.