गिरणीत ओढणी अडकून मुलीचा मृत्यू

By Admin | Updated: November 6, 2016 20:39 IST2016-11-06T20:39:41+5:302016-11-06T20:39:41+5:30

धारूर येथील मोमीन गल्लीत पिठाच्या गिरणीतील पट्ट्यात ओढणी अडकल्याने फास लागून शेख आयाशा शेख सिंकदर (१४) या मुलीचा मृत्यू झाला.

The collapse of a woman in the fall | गिरणीत ओढणी अडकून मुलीचा मृत्यू

गिरणीत ओढणी अडकून मुलीचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 6 -  धारूर येथील मोमीन गल्लीत पिठाच्या गिरणीतील पट्ट्यात ओढणी अडकल्याने फास लागून शेख आयाशा शेख सिंकदर (१४) या मुलीचा रु ग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. तिच्या पार्थिवावर धारु र येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . 
येथील मोमीन गल्ली भागात रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान शेख आयाशा शे. सिंकदर पिठाच्या गिरणीवर काम करीत असताना गळ्यातील ओढणी गिरणीच्या पट्ट्यात अडकल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी धारूर ग्रामीण रुग्णालयात नेले. ती अत्यवस्थ असल्यामुळे तिच्यावर डॉ. केशव इंगोले, डॉ. घरत, डॉ. परवेज शेख यांनी प्राथमिक उपचार करून  तिला अंबाजोगाईला हलवण्यात आले. तिला शासकीय रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना  या मुलीचा  मृत्यू झाला. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला नोंद झाली नव्हती.आयाशाची आई पिठाची गिरणी चालवते. दोन दिवसापूर्वी आई परगावी गेल्याने ती पिठाची गिरणी चालवत होती. गिरणीत दळण सुरू असताना ती जेवण करत होती. जेवण करत असतानाच ती दळण व्यवस्थित सुरू आहे का, हे पाहण्यासाठी गेली होती. 

Web Title: The collapse of a woman in the fall