शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

खेळी की योगायोग; उमेदवारांची सारखी नावे दोन आमदारांचा करणार 'कार्यक्रम'?

By सोमनाथ खताळ | Updated: November 8, 2024 16:52 IST

नाव आणि आडनाव सारखेच : लोकसभेत चिन्हावरून आता नावावरून उडेल गोंधळ

- सोमनाथ खताळबीड : लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी या दोन चिन्हांवरून गोंधळ उडाला होता. याचा काही ठिकाणी फटका बसल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. आता विधानसभेतही चिन्हाऐवजी सारख्या नावांमुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. याचा फटका दोन विद्यमान आमदारांना बसू शकतो. हा योगायोग आहे की विरोधकांची खेळी? हा मात्र प्रश्न आहे. सध्या तरी या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

जिल्ह्यातील बीड, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि गेवराई या सहा विधानसभा मतदारसंघांत ४०७ उमेदवारांनी ५६६ अर्ज दाखल केले होते. यातील ३० अर्ज अवैध ठरले. २३८ जणांनी माघार घेतली असून, आता १३९ जण निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील ८१ उमेदवार अपक्ष रिंगणात आहेत. केज आणि परळीत दुरंगी लढत हाेत आहे. गेवराईत तिरंगी, तर आष्टीत चौरंगी आणि बीड व माजलगावमध्ये पंचरंगी लढत होत आहे. परंतु, गेवराई, माजलगाव आणि परळी मतदारसंघात नाव आणि आडनाव सारखे असलेले सहा उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. त्यामुळे लोकसभेत चिन्हावरून गोंधळ उडाल्याचा दावा जसा महाविकास आघाडीने केला होता, तसाच आता प्रमुख उमेदवारांकडूनही केला जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी या नावांची चर्चा जोरात आहे. विरोधकांकडून या नावांचा वापर करून राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्नही होऊ शकतो, असे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

...यांना बसेल फटकागेवराईत भाजपचे लक्ष्मण माधवराव पवार हे विद्यमान आमदार आहेत. ते सध्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासारखेच लक्ष्मण अंबादास पवार या नावाचे उमेदवार गेवराईत आहेत. तसेच माजलगावातही अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सुंदरराव सोळंके यांच्याप्रमाणेच प्रकाशदादा भगवान सोळंके नावाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पहिल्या आणि शेवटच्या सारख्या नावाचा फटका या दोन्ही विद्यमान आमदारांना बसू शकतो.

परळीतही दोन देशमुखपरळी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राजेसाहेब श्रीकिशन देशमुख हे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह घेऊन मैदानात आहेत. त्यांच्याप्रमाणे राजेसाहेब सुभाष देशमुख हेदेखील बासरी चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत. या चिन्हावरूनही गोंधळ होऊ शकतो. येथे महायुतीकडून अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे रिंगणात आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकmajalgaon-acमाजलगांवgeorai-acगेवराईPrakash Solankeप्रकाश सोळंकेLaxman Pawarलक्ष्मण पवार