CM's announcement in Beed today | मुख्यमंत्र्यांची आज बीडमध्ये जाहीर सभा
मुख्यमंत्र्यांची आज बीडमध्ये जाहीर सभा

बीड : आगामी विधानसभा निवडणूकीत लोकसभेप्रमाणे प्रचंड बहुमत प्राप्त करून राज्यात नवीन परिवर्तन करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने हाती घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे भाजपा महाजनादेश यात्रेचे सोमवारी बीड येथे सायंकाळी ६ वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांची जाहीर सभा पारस नगर, माने कॉम्पलेक्स येथे होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा युवा नेते तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयश्री राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
मागील २५ वर्षात खुंटलेल्या विकासाला खऱ्या अर्थाने गती देवून पाच वर्षापासून शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेवून महाराष्ट्राला समृध्दीचा मंत्र देण्याचे काम या शिवशाही सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री मुंडे यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अखंड व विकसनशिल देश ही धारणा घेवून भारत देश पुढे जात आहे. पुन्हा एकदा राज्यात भाजपाचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापित करण्याची संधी समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी होणाºया जाहिर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले आहे.


Web Title: CM's announcement in Beed today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.