बंद असलेला शेतरस्ता केला खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:52+5:302021-06-18T04:23:52+5:30
गेवराई : मागील काही वर्षांपासून बंद असलेला तालुक्यातील कोळगाव येथील शेतरस्ता अखेर गुरुवारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत ...

बंद असलेला शेतरस्ता केला खुला
गेवराई : मागील काही वर्षांपासून बंद असलेला तालुक्यातील कोळगाव येथील शेतरस्ता अखेर गुरुवारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत खुला केला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्याची अडचण दूर झाली आहे.
तालुक्यातील कोळगाव येथील राम बरहाते, नामदेव बरहाते, नरहरी जाधव, बाबुराव आजबे, पांडुरंग सोनसाळे, महादेव सोनसाळे, अर्जुन सोनसाळे, रामा नेमाने, आसाराम बरहाते, आसाराम जोगदंड, भरत जोगदंड, शरद बरहाते यांच्या शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता मागील काही वर्षांपासून वादामुळे बंद होता. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व शेतजमिनीची वहिवाट करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हा रस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे धाव घेतली होती. महसूल प्रशासनाने हा रस्ता शेतकऱ्यांना खुला करून देण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठ्यांना आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी मंडळ अधिकारी साळुंके, तलाठी डी. ए. शेळके यांनी कारवाई केली. तसेच जेसीबीच्या सहाय्याने शेतरस्ता खुला केला. यामुळे काही वर्षांपासून रस्त्याअभावी शेतकऱ्यांची फरफट महसूल विभागाच्या या कारवाईने थांबणार असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
===Photopath===
170621\img-20210617-wa0286_14.jpg