सत्ता बदलाचे चटके जिल्ह्याला, मात्र धारूरला दिसत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST2021-06-28T04:23:12+5:302021-06-28T04:23:12+5:30

धारूर : सत्ता बदलामुळे जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांना चटके बसले आहेत. मात्र, धारूरला याचे चटके बसल्याचे दिसत ...

The clicks of change of power are not visible to the district, but to Dharur | सत्ता बदलाचे चटके जिल्ह्याला, मात्र धारूरला दिसत नाहीत

सत्ता बदलाचे चटके जिल्ह्याला, मात्र धारूरला दिसत नाहीत

धारूर : सत्ता बदलामुळे जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांना चटके बसले आहेत. मात्र, धारूरला याचे चटके बसल्याचे दिसत नसून विकासकामे चांगल्या प्रकारे सुरू आहेत, आपल्या कार्यकाळात विकासकामांचे सातत्य ठेवत असल्याने डॉ. हजारींचे कार्य कौतुकास्पद असल्याचे खा. प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे.

स्वच्छता हीच सेवा अंतर्गत ‘झाडे लावा झाडे जगवा’, वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन खा. मुंडे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी त्या बोलत हाेत्या. नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी, मुख्याधिकारी नितीन बागूल, उपाध्यक्षा मीनाक्षी गायकवाड, भाजपा नेते उदयसिंह दिख्खत, नगरसेविका रंजना चव्हाण, ज्योती सिरसट आदींची यावेळी उपस्थिती होती.

या प्रास्ताविकात नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी म्हणाले, शहरामध्ये तीन हजार वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करण्याचे काम सुरू आहे. गुत्तेदारावर संगोपनाची जबाबदारी असल्याचे सांगितले. कासार तलाव सुशोभीकरण, अद्ययावत कॉप्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. नगर परिषदेची इमारत अद्ययावत झाली असून, १० कोटी रुपयांच्या निधीतून कामे सुरू आहेत. सत्ता बदलानंतर निधी अडविल्यामुळे काही कामे करण्यासाठी अडचणी आल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन बाळासाहेब गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास नगरसेवक, पदाधिकारी, महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

===Photopath===

270621\1818-img-20210627-wa0086.jpg

===Caption===

धारूर नगरपरीषद मध्ये वृक्षारोपन करताना खा.प्रितम मुंडे नगराध्यक्ष डाॕ. स्वरूपसिंह हजारी भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी उदयसिंह दिख्खत मुख्याधीकारी नितिन बागूल

Web Title: The clicks of change of power are not visible to the district, but to Dharur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.