लिंबुटा येथे श्रमदानातून सभागृह, मंदिरांची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST2021-04-05T04:29:56+5:302021-04-05T04:29:56+5:30
या सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम गतवर्षीच झाले आहे तर हनुमान मंदिरासमोरील सभामंडपाचे बांधकाम काही वर्षांपूर्वी झालेले आहे. दोन्ही सभागृहांंची ...

लिंबुटा येथे श्रमदानातून सभागृह, मंदिरांची साफसफाई
या सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम गतवर्षीच झाले आहे तर हनुमान मंदिरासमोरील सभामंडपाचे बांधकाम काही वर्षांपूर्वी झालेले आहे. दोन्ही सभागृहांंची गतवर्षीच रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. मागील आठवड्यात दोन्ही सभागृहांत विद्युत व्यवस्था केली आहे. रविवारी श्रमदानातून या इमारतींच्या व आतून बाहेरून झालेल्या जाळ्या काढण्यात आल्या तसेच परिसरात स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे आता या दोन्ही सभागृहांचे सौंदर्य फुलून दिसत आहे.
संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था, लिंबुटा, ता.परळी, जि.बीड संचलित सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती, लिंबुटाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून येथे दर रविवार अथवा एक रविवारआड श्रमदान केले जात आहे. या श्रमदानातून वृक्षसंवर्धनही केले जात आहे. २०१९मध्ये लावलेल्या वृक्षरोपांचे झाडांमध्ये रूपांतर झाले आहे, तर गतवर्षी लावलेली वृक्षरोपे चांगली वाढत आहेत. या श्रमदानात दगडू मुंडे, अक्षय मुंडे, विष्णू मुंडे, रोहन खाडे, मंगेश दिवटे, शस्त्रगुण मुंडे, रामदास दिवटे, विकास दिवटे, विश्वनाथ मुंडे, इंद्रमोहन मुंडे, विश्वांभर दोडके, अशोक मुंडे आदींनी योगदान दिले.
===Photopath===
040421\img_20210404_085858_14.jpg