भगवा सप्ताहात किल्ला परिसराची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:30 IST2021-01-18T04:30:27+5:302021-01-18T04:30:27+5:30

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त १७ ते २३ जानेवारीदरम्यान मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे, जिल्हा संपर्क मंत्री ...

Cleaning of fort area during saffron week | भगवा सप्ताहात किल्ला परिसराची स्वच्छता

भगवा सप्ताहात किल्ला परिसराची स्वच्छता

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त १७ ते २३ जानेवारीदरम्यान मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे, जिल्हा संपर्क मंत्री संदीपान भुमरे, बीड जिल्हा संपर्क आनंद जाधव यांच्या आदेशावरून बीड जिल्हा शिवसेना प्रमुख सचिन मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले धारुर येथे भगवा सप्ताह साजरा होत आहे. येथील ऐतिहासिक किल्ल्यात स्वच्छता अभियान राबवून येथील गोडी दिंडी परिसरात बाभळी, विविध प्रकारच्या झाडाझुडपांनी वेढलेला परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात कायाकल्प फाउंडेशननेही सहभाग नोंदवला. यावेळी तालुका प्रमुख नारायण कुरुंद, बाबा सराफ, सुनील भांबरे, गणेश पवार, संजय पंडित, विशाल सराफ, सुधीर गुळवे, विक्की घोडके, सोनू धुमाळ, बालाजी मुंडे, पत्रकार सय्यद शाकेर सर, कायाकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, जलदूत विजय शिनगारे, अलंकार कामाजी ज्ञानेश्वर शिंदे. सह शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Cleaning of fort area during saffron week