पाटोदा शहरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:26+5:302021-06-24T04:23:26+5:30
पाटोदा : शहरातील माळीगल्ली, आरबगल्ली, कुंभारवाडा या भागामध्ये मंगळवारी रात्री १५ ठिकाणी घरे, दुकाने फोडली. काही ठिकाणी नागरिकांच्या जागरूकतेने ...

पाटोदा शहरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ
पाटोदा : शहरातील माळीगल्ली, आरबगल्ली, कुंभारवाडा या भागामध्ये मंगळवारी रात्री १५ ठिकाणी घरे, दुकाने फोडली. काही ठिकाणी नागरिकांच्या जागरूकतेने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न असफल झाला.
नगरसेवक विजय विजय जोशी यांचे बंधू अमोल जोशी यांच्या किराणा दुकानात चोरी केली. या दुकानातून चोराने १५ हजार रुपये बिस्कीट पुडे, पेंडखजूर, तेलाचे पाकिट चोरून नेले. ज्येष्ठ पत्रकार इद्रीस चाऊस यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असताना घरातील लोक जागे झाल्याने चोरट्यांनी तेथून धूम ठोकली.
पाटोदा शहराचे माजी सरपंच शिवाजी नाईकनवरे यांच्या घरातही चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला. पारगाव रोडवरील सय्यद इस्माईल यांचे कपड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी १५ हजाराचे कपडे व रोख रकमेवर डल्ला मारला. या सर्व घटना मंगळवारी रात्री १२.३० ते १.३० वाजण्याच्या सुमारास घडल्या. या घटनेने पाटोदा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भुरट्या चोरांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी ग्रस्त वाढविण्याची मागणी नागरिकातून होत आहे.