नागरिकांनो, मोबाइल सांभाळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:08+5:302021-09-04T04:40:08+5:30
सहा ठिकाणी मोबाइल चोरी बीड: शहरात दुचाकी चोरांपाठोपाठ मोबाइल चोरांचाही धुमाकूळ सुरू आहे. मागील २३४ तासांत सहा मोबाइल चोरट्यांनी ...

नागरिकांनो, मोबाइल सांभाळा...
सहा ठिकाणी मोबाइल चोरी
बीड:
शहरात दुचाकी चोरांपाठोपाठ मोबाइल चोरांचाही धुमाकूळ सुरू आहे. मागील २३४ तासांत सहा मोबाइल चोरट्यांनी लंपास केले. पेठ बीड ठाणे हद्दीत ३, शिवाजीनगर हद्दीत २ व अंभोरा हद्दीत १ असे सहा गुन्हे दाखल झाले.
शहरातील शेख परवेज शेख चांद या तरुणाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुुतळ्याजवळ पानटपरी आहे. पानटपरीतून १ सप्टेंबर रोजी चोरट्याने मोबाइल लंपास केला. आष्टी तालुक्यातील दौलावडगाव बसस्थानकासमोरुन अशोक केशव दळवी यांचा ७ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरटयांनी लांबविला. अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मोमीन अबुझर अब्दुल वहाब (रा. बार्शी नाका, बीड) या व्यापाऱ्याचा ६ हजार रुपयांचा मोबाइल १ सप्टेंबर रोजी गर्दीचा फायदा घेत दुकानातून लंपास केला. चौथ्या घटनेत अब्दुल मोईज अब्दुल रहीम मोमीन (रा. मोमीनपुरा) या व्यापाऱ्याचा मोबाइल २ सप्टेंबर रोजी दुपारी चोरट्याने दुकानात झालेल्या गर्दीत लंपास केला. पाचव्या घटनेत शेषनारायण बाबासाहेब चोले (रा. बीड) या तरुणाचा ५ हजार रुपये किमतीचा मोबाइल घरातून चोरट्याने लांबवला. सहावी घटना बीडमधील माने कॉम्प्लेक्स परिसरात राहणाऱ्या कार्तिक हरेश वाघीरे या तरुणाच्या बाबतीत घडली. त्याने घरात चार्जिंगला लावलेला ५ हजार रुपये किमतीचा मोबाइल २ सप्टेंबरच्या पहाटेच्या सुमारास लंपास केला.