विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST2021-01-09T04:28:15+5:302021-01-09T04:28:15+5:30
अंबाजोगाईत पदपथावर आक्रमण अंबाजोगाई : शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूला फुटपाथ सोडण्यात आले आहेत. मात्र, या फुटपाथवर छोट्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण ...

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
अंबाजोगाईत पदपथावर आक्रमण
अंबाजोगाई : शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूला फुटपाथ सोडण्यात आले आहेत. मात्र, या फुटपाथवर छोट्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरून जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
गेवराई परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचा बंदोबस्त करून शहरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पोलीस ठाण्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
पालिकेकडून स्वच्छता होईना
माजलगाव : शहरातील विविध भागात घाण साचली आहे. यामुळे विविध आजारांचा प्रसार वाढला असून खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात लोक उपचार घेत आहेत. न.प.ने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
खड्डे बुजविणार
बीड : बीड-अहमदनगर राज्यमार्गावर पडलेल्या खड्डयाने वाहनचालकांना त्रास होत आहे. दिवाळी सणाच्या तयारीसाठी नागरिक घराबाहेर पडणार असल्याने त्यांना त्रास होऊ नये म्हणून आठ दिवसात संबंधित गुत्तेदार खड्डे बुजवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.