मोफत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:42+5:302021-08-18T04:39:42+5:30
अक्षय मुंदडा म्हणाले, तरुण मित्रांनी गल्लीतील नागरिकांसाठी या उपक्रमामुळे आरोग्यविषयक जनजागृती होईल तसेच भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम ...

मोफत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद
अक्षय मुंदडा म्हणाले, तरुण मित्रांनी गल्लीतील नागरिकांसाठी या उपक्रमामुळे आरोग्यविषयक जनजागृती होईल तसेच भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी कले. अश्विनकुमार मुकदम म्हणाले, गल्लीतील नागरिकांसाठी असे विविध उपक्रम राबविल्यामुळे एक आपलेपणाचे नाते पद्मनाभ मित्रमंडळाने जपले आहे.
अविनाश अघोर यांनी आतापर्यंत विविध तालुका अंबाजोगाई शहरात नेत्र तपासणी शिबिरातून जनजागृतीचे कार्य केले आहे. त्यांचे हे ७५ वे नेत्र तपासणी शिबिर आहे. सूत्रसंचालन विशाल देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक वैभव कुलकर्णी यांनी केले. विशाल भोसले यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी दासोपंत संशोधन मंडळात महिला पुरुष व तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
170821\fb_img_1629141054519.jpg
मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन करताना उपस्थित मान्यवर