शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

वाल्मीकची प्रॉपर्टी जप्तीसाठी सीआयडीचा तर निर्दोष मुक्त करा म्हणून कराडचा न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:10 IST

माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, खटल्यातून निर्दोष मुक्त करा, वाल्मीक कराडचा न्यायालयात अर्ज उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती, पुढील सुनावणी २४ एप्रिलला

बीड : सरपंच संतोष देशमुख खटल्यातून निर्दोष मुक्तता करावी, माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, असा अर्ज आरोपी वाल्मीक कराड याने न्यायालयात सादर केला आहे. त्यावर न्यायालयाने सीआयडीचे म्हणणे मागितले आहे, २४ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत सदरील अर्जावर म्हणणे मांडले जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.

बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी गुरुवारी पार पडली. सुनावणीनंतर शासकीय विश्रामगृहावर ॲड. निकम यांनी प्रसिद्धी माध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या सोबत सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते. पुढे ॲड. निकम म्हणाले, सुनावणीत आरोपी वाल्मीक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती, त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री सीआयडीतर्फे आम्ही न्यायालयात सादर केली. काही दस्तावेज हे सीलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली की, त्याच्या प्रति सील उघडल्यानंतर आरोपींना देण्यात याव्यात. यामधील दुसरा मुद्दा म्हणजे, वाल्मीक याने या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्याचा अर्ज न्यायालयास सादर केला आहे. त्यावर पुढील सुनावणीत सीआयडी आपले म्हणणे मांडेल. आरोपी वाल्मीकच्या युक्तिवादानंतर सरकार पक्षातर्फे आम्ही युक्तिवाद करू, असे ॲड. निकम म्हणाले. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे, संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडीओ आरोपींनीच काढला होता हे सीआयडीच्या तपासाअंती समोर आले होते. हा व्हिडीओ सीलबंद परिस्थितीत फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता, तो संपूर्ण व्हिडीओ आम्ही न्यायालयात सादर केला. आम्ही न्यायालयास विनंती केली की, या व्हिडीओला बाहेर प्रसिद्धी मिळू नये, त्या व्हिडीओला प्रसिद्धी मिळाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यावर सर्व आरोपींचे म्हणणे मागितले आहे, त्यांचे म्हणणे २४ एप्रिल रोजी दिले जाईल, त्याच्यानंतर या संदर्भातदेखील सुनावणी होईल, असे ॲड. निकम म्हणाले.

आरोपीचा खुलासा सादर नाहीआरोपी वाल्मीक याची चल आणि अचल मिळकत जप्त करावी, असा अर्ज आम्ही न्यायालयात दिलेला आहे. त्या अर्जावर अद्यापही वाल्मीकतर्फे खुलासा सादर करण्यात आलेला नाही. मकोकाखाली आरोपी वाल्मीकची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी, असा अर्ज सीआयडीतर्फे न्यायालयास देण्यात आला आहे. आराेपीने निर्दोष मुक्तीसाठी अर्ज दिल्याने त्या अर्जावर सुनावणी होईल. पुढे सरकारतर्फे आम्ही न्यायालयात एक ड्राफ्ट चार्ज देऊ, सदरील चार्ज फ्रेम करावी की नाही यावरील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय निर्णय घेईल, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले.

नंतर कॉमेंट करेनमुंबई दहशतवादी हल्ल्यातील तहव्वूर राणाला भारतात आणले जाणार आहे, या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नासंदर्भात उत्तर देताना ॲड. निकम म्हणाले, एखादा आरोपी परदेशातून भारतात आणणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अतिशय महत्त्वपूर्ण असून त्याच्या अनेक स्टेजेस असतात. आरोप काय ठेवले जातात, काय नाही हे बघणे महत्त्वाचे ठरेल, त्यावर मी नंतर कॉमेंट करेन.

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या