जन्मदात्या बापावर गोळ्या झाडून जिवे मारण्याचा मुलाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:35 IST2021-05-21T04:35:39+5:302021-05-21T04:35:39+5:30

आष्टी : आष्टी शहरातील विनायकनगर भागामध्ये जन्मदात्या बापावर मुलाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना ...

The child's attempt to kill the father by shooting him | जन्मदात्या बापावर गोळ्या झाडून जिवे मारण्याचा मुलाचा प्रयत्न

जन्मदात्या बापावर गोळ्या झाडून जिवे मारण्याचा मुलाचा प्रयत्न

आष्टी : आष्टी शहरातील विनायकनगर भागामध्ये जन्मदात्या बापावर मुलाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना २० मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. आष्टी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष किसन लटपटे (वय ५०) असे जखमी पित्याचे नाव असून, ते माजी सैनिक आहेत. त्यांच्यावर मुलगा असलेल्या किरण संतोष लटपटे (२४) याने घरगुती वादातून बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर झाडण्यात आल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते. यातून घरात सातत्याने छोटे-मोठे वाद होत असत. या वादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

Web Title: The child's attempt to kill the father by shooting him